News Flash

Video: सनी लिओनीने नवाजुद्दीनला खुर्चीवर बांधून केला डान्स

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच सनीने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला खुर्चीवर बांधले असुन सनी लिओनी त्याच्या समोर नृत्य करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटातील ‘बत्तियां बुझादो’ या गाण्याचा आहे. या गाण्यातील एक दृष्य सनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या व्हिडिओमध्ये सनीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. दरम्यान नवाजुद्दीनला खुर्चीवर बांधले आहे. तो स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतोय, आणि सनी लिओनी त्याची खिल्ली उडवत त्याच्यासमोर नृत्य करत आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासातच तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी असाच व्हिडीओ सनीने इन्स्टाग्रमावर शेअर केला होता. या व्हिडीओतही तिने ‘बत्तियां बुझादो’ याच गाण्यावर नृत्य केले होते. ‘बत्तियां बुझादो’ हे गाणे नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट ‘मोतीचूर चकनाचूर’ यातील आहे. हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:32 pm

Web Title: nawazuddin siddiqui sunny leone battiyan bujhaado motichoor chaknachoor mppg 94
Next Stories
1 .. अन् थोडक्यात बचावली निया शर्मा
2 मुलीच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला मीच मदत करतो – शाहरुख खान
3 शाहरूख का झाला कट्टरतावाद्यांकडून ट्रोल ?
Just Now!
X