News Flash

“…म्हणून ‘दिल बेचारा’वर टीका करु नका”; नवाजुद्दीनची समिक्षकांना भावूक विनंती

नवाजुद्दीन सिद्दिकीने ‘दिल बेचारा’वर चित्रपटावर दिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीने देखील ‘दिल बेचारा’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. किमान या चित्रपटावर तरी कोणीही टीका करु नका, अशी विनंती त्याने केली आहे.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

“मी सर्व सन्मानित चित्रपट समिक्षकांना विनंती करतोय की सुशांतच्या या चित्रपटावर कुठलीही टीका करु नका. या चित्रपटाकडे सुशांतला दिलेली श्रद्धांजली म्हणून पाहा. ‘दिल बेचारा’ला सर्वांनी मिळून सेलिब्रेट करुया. अशा आशयाचं ट्विट नवाजुद्दीन सिद्दिकीने केलं आहे.” त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सिनेमागृह बंद आहेत. परिणामी ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे. १ तास ४१ मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील १० पैकी १० रेटिंग दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 4:41 pm

Web Title: nawazuddin siddiqui sushant singh rajputs last film dil bechara mppg 94
Next Stories
1 टायगर श्रॉफची आई संतापली, अनुराग कश्यपला मागावी लागली माफी
2 Video : नवोदितांनी त्यांच्या कामावर विश्वास ठेवायला हवा- अक्षय इंडीकर
3 “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर
Just Now!
X