28 September 2020

News Flash

‘सत्य विकत घेता येत नाही’; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने व्यक्त केला संताप

आलियाने इमेलद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे

नवाजुद्दीन सिद्दिकी व त्याची पत्नी आलिया सिद्दिकी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत येत आहे. आलियाने इमेलद्वारे नवाजुद्दीनला घटस्फोटाची नोटीस पाठविली आहे. १० वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर वैवाहित जीवनातील चढाओढींमुळे तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आलियाने घेतलेल्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर सध्या नवाजुद्दीन आणि आलियाचीच चर्चा सुरु असून आलियाने नुकतंच ट्विटरवर पदार्पण केलं आहे. सत्य कधी लपत नाही आणि सत्याला विकतही घेता येत नाही, असं ट्विट तिने केलं आहे.

काही दिवसापूर्वीच आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर काही गंभीर आरोप केले होते. नवाजुद्दीनच्या कुटुंबीयांनी मानसिक त्रास व शारीरिक शोषण केल्याचं तिने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक नवनवीन चर्चा रंगल्या आहेत. मात्र अनेकांनी तिच्यावरही टिकास्त्र डागलं आहे.

”मी आलिया सिद्दीकी आहे. माझ्याविषयी कोणी गैरसमज करुन घेऊ नये यासाठी नाईलाजास्तोवर मला ट्विटरवर येऊन सत्य सांगावं लागत आहे. सत्य हे कायम सत्य असतं. ते कधी विकतही घेता येऊ शकत नाही आणि बदलतादेखील येत नाही”, असं ट्विट आलियाने केलं आहे.

पुढे ती म्हणते, “सगळ्यात प्रथम मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी कोणत्याही परपुरुषासोबत रिलेशनशीपमध्ये नाही. काही प्रसारमाध्यमे माझ्याविषयी असे दावे करत आहेत, मात्र ते सारे खोटे आहेत. उगाचचं लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचं मला वाटत आहे. मी स्वत:साठी लढायला आणि बोलायला शिकत आहे. मी माझ्या मुलांसाठी खंबीर होत आहे आणि मला नाही वाटत यात माझं काही चुकतंय. मी सध्या मला कशाचीच चिंता नाहीये. त्यामुळे कोणी जर माझ्या चारित्र्यावर संशय घेत असेल किंवा माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत असेल तर मी कधीच ते सहन करणार नाही. पैशांमुळे सत्य विकत घेता येत नाही”.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांच्या संसाराला १० वर्ष झाली असून त्यांना दोन मुलं आहेत. लग्नाला एक वर्ष झालं, तेव्हापासूनच वैवाहिक जीवनात चढउतार सुरू झाल्याचं आलियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. आलियाने घटस्फोटाची नोटीस पाठवल्यावर अद्याप नवाजुद्दीनने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. लॉकडाउन असल्यामुळे इमेल आणि व्हॉट्स अॅपद्वारे नोटीस पाठवल्याचं आलियाच्या वकिलांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 10:23 am

Web Title: nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui on twitter for her voice ssj 93
Next Stories
1 …तर ‘३ इडियट्स’मध्ये बोमन इराणीऐवजी इरफानने साकारली असती ‘व्हायरस’ची भूमिका
2 सुबोध भावेची पहिली कमाई ऐकून व्हाल थक्क; हजारांमध्ये नव्हे तर रुपयांमध्ये मिळालं होतं मानधन
3 “माझ्याकडे औषधं, भाजी विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत”, महाभारतातील अभिनेत्याने मांडली व्यथा
Just Now!
X