09 August 2020

News Flash

‘मला प्रसूती कळा सुरु असताना नवाज गर्लफ्रेंडसोबत बोलत होता’; पत्नीने केला नवा आरोप

'नवाज तीन-चार तास सलग गर्लफ्रेंडसोबत बोलायचा'

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी सतत चर्चेत आहे. आलियाने नवाजला इमेलद्वारे घटस्फोटाची नोटीस पाठवल्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं. त्यानंतर आलिया प्रकाशझोतात आली असून तिने नवाज आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक आरोप केले आहेत. यातच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने नवाजवर आणखी एक नवा आरोप केला आहे. मी गरोदर असताना नवाज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असायचा असं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.

“२००३ पासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. त्यामुळे तेव्हापासूनच आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. या काळात नवाजचा भाऊसुद्धा आमच्यासोबत राहत होता. आम्ही तिघांनी मिळून एका चित्रपटावर एकत्र कामही केलं होतं. याच काळात मी आणि नवाज प्रेमात पडलो आणि आम्ही लग्न केलं. खरंतर लग्नानंतर सुरुवातीला आमच्या अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. परंतु, कालांतराने या समस्या दूर होतील असं मला वाटलं होतं. मात्र, लग्नाला १५-१६ वर्ष झाले तरीदेखील माझा मानसिक त्रास कमी झाला नव्हता”, असं आलियाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “मला आजही आठवतंय जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो आणि लग्नाचाही विचार करत होतो. त्याचवेळी नवाज अन्य एका महिलेसोबत रिलेशनशीपमध्ये आहे हे मला सतत जाणवत होतं. या मुद्द्यावरुन अनेक वेळा लग्नापूर्वी आमच्यात वादही झाले होते. लग्नानंतर मी प्रेग्नंट होते त्यावेळी देखील प्रत्येक टेस्ट करण्यासाठी मी एकटीच रुग्णालयात जायचे. इतकंच नाही तर डिलिव्हरीच्या वेळेसदेखील मी एकटीच गेले होते. हे पाहून तू वेडी आहेस का? असं माझी डॉक्टर कायम मला म्हणायची. मी पहिली अशी स्त्री आहे जी डिलेव्हरीच्या वेळी एकटीच रुग्णालयात गेली होती. जेव्हा मला प्रसूतीकळा सुरु झाल्या तेव्हा नवाज आणि त्याचे आई-वडील तिथे होते. पण जेव्हा मला खूप त्रास होत होता तेव्हा माझा नवरा माझ्यासोबत नव्हता. तो त्याच्या प्रेयसीसोबत फोनवर बोलण्यात व्यग्र होता. मला या विषयी सगळं ठावूक होतं, कारण त्याच्या फोनचं बील मी पाहिलं होतं. नवाजचा भाऊ मला नवाजच्या फोनचे बील आणून द्यायचा त्यात नवाज तीन ते चार तास त्याच्या प्रेयसीसोबत बोलत असायचा हे दिसून आलं होतं. माझ्या पहिल्या गरोदरपणातदेखील त्याच्यात कोणतीच भावनिकता दिसून येत नव्हती, याच सगळ्या कारणांमुळे मी त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आलियाने ९ मे रोजी इमेल आणि व्हॉट्सअॅपवर नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठविली. “नवाजशी घटस्फोट घेण्यामागे एक नाही तर अनेक कारणं आहेत आणि ही सगळी कारणं गंभीर आहेत, असं म्हणत आलियाने ही नोटीस पाठविली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 9:49 am

Web Title: nawazuddin siddiqui wife aaliya siddiqui reveals shocking things about actor says he used to talk his girlfriend when i was pregnant ssj 93
Next Stories
1 अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या ‘उमेश दादा’ला मुंबई पोलिसांकडून अटक
2 ….अन् अशी मिळाली शैलेश लोढाला ‘तारक मेहता’ची भूमिका
3 छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना संतापली, म्हणाली…
Just Now!
X