अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याचं आयुष्य गेल्या काही दिवसांमध्ये ढवळून निघालं आहे. आधी त्याच्या पत्नीनं कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करुन घटस्फोटाची मागणी केली. अन् आता त्याच्या भावावर पुतणीनेच लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आई हिंदू असल्यामुळे माझा छळ केला गेला असा आरोप तिने केला आहे. शिवाय या प्रकरणी तिने दिल्लीतील जामिया पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

आवर्जुन पाहा – सर्वाधिक कमाई करणाऱ्या २० सेलिब्रिटींच्या यादीत केवळ एक भारतीय

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनच्या पुतणीने हा धक्कादायक खुलासा केला. “नऊ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. लहान असताना मला त्या स्पर्शाचा अर्थ कळत नव्हता, परंतु जसजस वय वाढत गेलं तसतसं माझ्यासोबत चुकीचं काहीतरी घडतय याची जाणीव मला होऊ लागली. या विषयी मी आई-वडिलांकडे तक्रार देखील केली होती. परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कारण माझी आई हिंदू होती. मी दोन वर्षांचे असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. माझ्या सावत्र आईने माझा खूप छळ केला.” अशा आशयाचा खुलासा नवाजुद्दीनच्या पुतणीने या मुलाखतीत केला आहे.

राहुल गांधींवर इतकी टीका का करता?; स्वरा भास्करचा विरोधकांना सवाल

नवाजुद्दीनच्या पुतणीचं लग्न झालं असून तिच्या सासरच्यांनाही त्रास देण्यात येत असल्याचं तिने सांगितलं. “माझ्या लग्नानंतरही माझे वडील, मोठे काका नवाज यांनी सासरच्यांविरुद्ध खोटे खटले दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. आतासुद्धा दर सहा महिन्यांनी माझे वडील खोटे खटले दाखल करतात आणि आता माझ्या तक्रारीनंतरही ते काहीतरी करतील हे निश्चित आहे. पण माझ्या पतीची मला खंबीर साथ आहे. शारीरिक शोषणाचे पुरावे माझ्याकडे आहेत”, असं तिने स्पष्ट केलं.