24 September 2020

News Flash

शौविक चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ; NCBने केली खास मित्राला अटक

ड्रग्स प्रकरणी आणखी तीन व्यक्ती NCBच्या ताब्यात; एक कोटीची कार जप्त

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. शिवाय न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला ‘न्यायालयीन कोठडी’ सुनावली आहे. चौकशी दरम्यान या प्रकरणात दररोज नवी माहिती समोर येत आहे. या नव्या माहितीच्या आधारावर एनसीबीने आता करमजीत सिंह, सूर्यदीप मल्होत्रा आणि क्रिस कोस्टा या तीन व्यक्तींना अटक केली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार करमजीत सिंह हा शौविक चक्रवर्तीचा खास मित्र आहे. या ड्रग्स प्रकरणात त्याचाही सहभाग असल्याचा संशय NCBला आहे. दरम्यान त्यांनी करमजीतची एक कोटी रुपयांची मर्सिडिज-बेंझ कार जप्त केली आहे.

अवश्य पाहा – “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे”; उमर खलिदच्या अटकेवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप

अंमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला. ‘एनसीबी’चे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना ‘एनसीबी’ने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे अमली पदार्थाशी जोडलेले आहेत का, याबाबतही ‘एनसीबी’कडून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:19 pm

Web Title: ncb arrests showik chakrabortys friend drug cartel case mppg 94
Next Stories
1 “बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप
2 ..म्हणून संजय दत्तने अचानक सोडली मुंबई
3 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात
Just Now!
X