News Flash

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांची धमकी, म्हणाले…

"लवकरात लवकर बदल करा अन्यथा..."

आव्हाडांची धमकी

शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. मात्र या ट्रेलरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटवरुन या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे.

आव्हाड यांनी ओम राऊत यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप केला आहे. “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,” असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड या संघटनेने ट्रेलरबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण आहे, अभिनेञी काजोलच्या तोंडी असलेले संवाद आणि महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर दाखवण्यात आलेल्या ॐ ला ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. या सर्व गोष्टींबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राउत यांनी खुलासा करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान, मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळेस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. “चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर आम्ही बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजय म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 1:58 pm

Web Title: ncp leader jitendra awhad threatened tanhaji the unsung warrior director om raut scsg 91
Next Stories
1 ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचे होते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत अफेअर
2 राज ठाकरे लवकरच कुणाल काम्राबरोबर झळकणार?; ‘मनसे’च्या प्रवक्त्यांचे सूचक वक्तव्य
3 ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् पडला मीम्सचा पाऊस
Just Now!
X