झी मराठीवरील ‘नांदा सौख्यभरे’ या लोकप्रिय मालिकेतील नील आणि स्वानंदी यांचे ‘नांदा सौख्यभरे’ या रविवारी (१३ डिसेंबर) रोजी होणार आहे. या ‘शुभमंगल सावधान’च्या निमित्ताने रात्री ७ ते ९ या वेळेत ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेच्या विशेष भागाचे प्रसारण करण्यात येणार आहे. स्वानंदीला घरात सून म्हणून येऊ नये यासाठी विविध डाव टाकणारी नीलची आई ‘ललिता’ आणि या दोघांचे लग्न व्हावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणारी ‘वच्छी मावशी’यांच्या शह-काटशहाच्या खेळात हे लग्न निर्विघ्न पार पडते का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
स्वानंदी बरोबरच तिची बहिण ‘संपदा’हिचेही लग्न स्वानंदीसह एकाच मांडवात होणार आहे. पण ‘संपदा’ने ‘व्हिसा’ मिळेपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण स्वानंदी संपदाची समजूत काढते आणि हे काम नक्की होईल, असा विश्वास संपदाला देते. मात्र संपदाला व्हिसा नाकारला गेल्याचे कळते. त्यामुळे संपदा आता लग्नला उभी राहणार की नाही? हे ही या भागात पाहायला मिळणार आहे.
खोटय़ा श्रीमंतीचा बडेजाव करणारी आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या ललिताला आपली खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी घर विकण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. मुलाचे लग्न आणि घर विकण्याची तयारी अशा कचाटय़ात ललिता सापडली आहे. हे सर्व वच्छी मावशीच्या लक्षात येते. यातून पुढे काय घडते?, देशपांडे कुटुंबीयांना ललिताचे खरे स्वरुप कळते का? नील आणि स्वानंदी या दोघांचे लग्न सुखरुप पार पडते का? याची उत्तरे या दोन तासांच्या विशेष भागात मिळणार आहेत.
झी मराठी वाहिनीवरुन रविवारी सायंकाळी सात वाजता या विशेष भागाचे प्रसारण होणार आहे.

Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?