News Flash

‘मसाबाने दुसरे लग्न करावे का?’, नीना गुप्ता म्हणाल्या…

त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या सतत चर्चेत असता. त्या मुलगी मसाबा सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाचे नाव ‘सच कहूं तो’ असे आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे.

नीना गुप्ता यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुलगी मसाबाच्या आयुष्याबद्दलही काही गोष्टी सांगितल्या आहेत. मसाबा गुप्ताने निर्माता मधु मंटेनाशी लग्न केले होते. पण काही कारणास्तव त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांना विचारण्यात आले होते की मसाबाने दुसरे लग्न करावे असे तुम्हाला वाटते का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता नीना यांनी म्हटले, ‘तिने कोणताही निर्णय घेतला तरी मी तिच्यासोबत असेन.’

आणखी वाचा : ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला होता वाद

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

पुढे त्या म्हणाल्या, ‘ती आता ३० वर्षांची आहे. ती स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. ती स्वत:साठी जो काही निर्णय घेईल त्यासाठी माझा तिला पाठिंबा असेल. मी कायम तिच्यासोबत आहे. जेव्हा आम्ही मधुला भेटलो तेव्हा तो ठिक वाटला होता. पण मसाबा आणि त्याचे नाते फार काळ टिकले नाही. माझे त्याच्याशी कामा संदर्भात बोलणे होत असते.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 3:01 pm

Web Title: neena gupta asked if her daughter masaba gupta wants to marry again actress reacts avb 95
Next Stories
1 दिग्दर्शक अनुराग कश्यपवर झाली अँजिओप्लास्टी
2 गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्रीने केली लिंगबदल सर्जरी, शेअर केला शर्टलेस फोटो
3 …म्हणून ‘किस’ कॉन्ट्रोव्हर्सीला विसरुन राखीने धरले मिकाचे पाय
Just Now!
X