News Flash

बोल्ड अंदाजात नीना गुप्तांनी केला ‘आज फिर जिने की तमन्ना है’वर डान्स

नीना यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

neena gupta, neera gupta instagram,
नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या बेली डान्सपासून ग्लॅमरस लूकपर्यंत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

नीना यांनी त्यांचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नीना यांनी काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. या व्हिडीओत ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्यावर नीना डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘आज फिर जिने की तमन्ना है’ नीना यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ६२ वर्षांच्या नीना गुप्ता यांचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लूकची स्तुती केली आहे.

आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

आणखी वाचा : BB OTT : ‘मला मुल पाहिजे पण…’, शमिताने राकेशला सांगितली तिच्या मनातली इच्छा

नीना गुप्ता लवकरच ’83’, ‘ग्वालियर’ आणि ‘गुडबाय’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या आधी त्यांचे ‘संदीप और पिंकी फरार’, ‘सरदार का ग्रॅंडसन’ आणि ‘छत्रसाल’ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. नीना गुप्ता यांना २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातून एक नवीन ओळख मिळाली. अलीकडेच त्यांचे ‘सच कहूं तो’ हे पुस्तकही प्रकाशित झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2021 10:29 am

Web Title: neena gupta video in shorts and black top dancing on aaj phir jeene ki tamanna hai goes viral dcp 98
Next Stories
1 ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करायचे आहे प्रभासशी लग्न
2 ‘राखी सावंत एक अशी व्यक्ती आहे…’, ट्विंकल खन्नाची पोस्ट पाहून राखी म्हणाली..
3 KBC 13: सात कोटींसाठी विचारण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘हा’ प्रश्न; देता आलं नाही उत्तर
Just Now!
X