सौंदर्य आणि उत्तम अभिनय कौशल्य यामुळे बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या नीतू सिंग-कपूर यांनी नुकतंच ६० व्या वर्षात पदार्पण केलं. नीतू सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त कलाविश्वातील अनेक मान्यवर मंडळी तसेच नवोदित कलाकारांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे आलिया भटनेदेखील इन्स्टावर एक फोटो शेअर करत नीतू सिंग यांना अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या. आलियाच्या या शुभेच्छा पाहून नीतू सिंग यांना मनस्वी आनंद झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

नीतू सिंग यांचा ६० वा वाढदिवस असल्यामुळे त्यांना अनोख्या अंदाजात शुभेच्छा देण्यासाठी गेल्या काही दिवसापासून कपूर कुटुंबीय कामाला जुंपलं होतं. आणि अखेर वाढदिवसाच्या दिवशी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीमध्ये आलियालादेखील आमंत्रित करण्यात आलं होत.मात्र या पार्टीमध्ये आलियाने उपस्थिती न दर्शविल्याचं पाहायला मिळालं.

#famjaminparis #mumsbday

A post shared by Riddhima Kapoor Sahni (@riddhimakapoorsahniofficial) on

कपूर कुटुंबीयांना पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये नीतू यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला असून या पार्टीमध्ये ऋषि कपूर, रिद्धिमा कपूर, रणबीर कपूर आणि कृष्णा राज उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. या छोटेखानी पार्टीमधील काही फोटो आणि व्हिडिओ रिद्धिमाने शेअर केले आहेत. यात शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिद्धिमा नीतू सिंग यांना घेऊन येतांना दिसत आहे. या पार्टीमध्ये आलिया येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव आलियाला उपस्थित राहता आले नाही.

दरम्यान, नीतू यांच्या वाढदिवसामुळे कपूर कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकतर नीतू यांचा वाढदिवस आणि दुसरीकडे संजू चित्रपटाचं यश यामुळे सध्या कपूर कुटुंबामध्ये आनंदाच वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.