News Flash

अर्जुन कपूर आणि मलायकाने न्यूयॉर्कमध्ये घेतली ऋषी कपूर यांची भेट

मलायकासोबतच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनीदेखील त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

ऋषी कपूर, नीतू कपूर, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा

सध्या बी-टाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. हे दोघे आता न्यूयॉर्कमध्ये फिरायला गेले आहेत. आपल्या वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. या चौघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेते ऋषी कपूर गेले काही महिने न्यूयॉर्कमध्ये आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत सोशल मीडियावर देत असतात. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या चौकशीसाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांची भेट घेतली. दीपिका पदुकोण, करण जोहर, विकी कौशल, शाहरुख खान, आमिर खान, या कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. आता मलायका आणि अर्जुन यांनीदेखील त्यांची भेट घेतली आहे.

मलायकासोबतच ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनीदेखील त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावरून या भेटीचा फोटो शेअर केला आहे. ‘घर का बच्चा अर्जुन आणि मलायका यांच्यसोबतची एक मजेशीर संध्याकाळ’ असे कॅप्शन नीतू कपूर यांनी लिहिले आहे. तर, मलायकाने ‘इतक्या सुंदर संध्याकाळसाठी नीतू आणि ऋषी अंकल तुमचे खूप आभार’ असे लिहिले आहे.

मलायकाने अरबाज खानला घटस्फोट देऊन आता बरेच महिने लोटले आहेत. मलायकाने आता खुलेपणाने अर्जुनचं नातं स्वीकारलं आहे. ‘आयुष्यात दुसरी संधी क्वचितच मिळते,’ असं मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 10:59 am

Web Title: neetu kapoor malaika arora newyork meet arjun kapoor rushi kapoor djj 97
Next Stories
1 #BottleCapChallenge: सेलिब्रिटीजने एकदम स्टाइलमध्ये पूर्ण केले चॅलेंज, पाहा व्हिडिओ
2 Video : सुष्मिता सेन आणि रोहमन यांनी केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण
3 ‘कबीर सिंग’चे बॉक्स ऑफिसवर द्विशतक
Just Now!
X