News Flash

मुलांसोबत का राहात नाही? नीतू कपूर यांनी सांगितले कारण

त्यांनी एका मुलखतीमध्ये खुलासा केला आहे.

लॉकडाउनच्या काळाता अभिनेत्री नीतू कपूर या मुलगी रिद्धिमा कपूरसोबत वेळ घालवताना दिसत होत्या. दोघी मायलेकी सोशल मीडियावर एकत्र वेळ घालवतानाचे देखील फोटो शेअर करताना दिसत होत्या. आता रिद्धिमा पुन्हा सासरी दिल्लीला गेली आहे. तर त्यांचा मुलगी रणबीर कपूर देखील गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत राहताना दिसतो. दरम्यान नीतू कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये ऋषि कपूर यांच्या निधनानंतर रणबीर आणि रिद्धिमासोबत का राहात नाही याचे कारण सांगितले आहे.

नुकताच नीतू कपूर यांनी फिल्म फेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकटं राहण्यामागचे कारण सांगितले आहे. ‘माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात व्यग्र रहावे. मी त्यांना सांगत असते माझ्या हृदयात रहा पण माझ्या डोक्यावर चढू नका. लॉकडाउनच्या काळात जेव्हा रिद्धिमा माझ्यासोबत राहत होती तेव्हा मला काळजी वाटायची. मी तिला सारखं बोलायची की तू परत दिल्लीला जा. तुझा पती भरत तुझी वाट पाहात असेल. मी तिला सारखं जायला सांगत होते. मला एकटं राहायला आवडतं’ असे नीतू कपूर म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’, कमल हासन यांच्या मुलीवर कोसळलं आर्थिक संकट

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

पुढे नीतू कपूर म्हणाल्या, ‘मला अजूनपण लक्षात आहे जेव्हा रिद्धिमा शिक्षणासाठी लंडनला गेली होती तेव्हा मी खूप रडले होते. रिद्धिमाचे कोणी मित्रमैत्रिणी घरी आले तरी मला रडू कोसळायचं. पण नंतर जेव्हा रणबीर शिक्षणासाठी बाहेर गेला तेव्हा मला रडू आले नाही. त्यावेळी मला मुलांपासून लांब राहण्याची सवय झाली होती. तसेच त्यांचे देखील आयुष्य आहे. ते जेव्हा मला भेटायला येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी पुन्हा आपापल्या घरी जाऊन आनंदाने आयुष्य जगावे असे मला वाटते. मी त्यांना नेहमी सांगते मला दररोज भेटू नका.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 4:53 pm

Web Title: neetu kapoor reveals the reason she does not live with her children avb 95
Next Stories
1 “घरातही शर्ट घालूनच राहायचं”, शाहरुख खानची मुलगा आर्यनला ताकीद!
2 सुगंधाने केली लता मंगेशकर यांची मिमिक्री, सांगितलं भोसले कनेक्शन
3 इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमधील वादावरून कंगना आणि इरफान पठाणमध्ये वादाची ठिणगी
Just Now!
X