आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत राहणारे बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता ऋषी कपूर सध्या एका मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर न्युयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांची पत्नी नीतू कपूर त्यांच्यासोबत आहे. नीतू कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे अनेक वेळा त्या त्यांच्या फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असतात. या फोटोच्या माध्यमातूनही त्या ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. सध्या त्यांनी ऋषी कपूरसोबतचा लंच डेटवरील फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोपेक्षा त्यांनी दिलेल्या कॅप्शनची सर्वात जास्त चर्चा रंगली आहे.
नीतू यांनी शेअर केलेला फोटो न्युयॉर्कमधील एका हॉटेलमधील असून त्या ऋषी कपूर यांच्यासोबत लंच डेटवर गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋषी कपूर फोनमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नीतू यांनी या प्रसंगाला साजेसं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
लग्नानंतर जर ३८ वर्षानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत लंच डेटवर जात असला, तर त्यावेळचं असंच काहीसं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. मी ऋषींसोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते मात्र फोनमध्ये हरवले आहेत. त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नाही, असं कॅप्शन नीतू यांनी या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर #10YearChallenge ची क्रेझ आहे. या चॅलेंजच्या अंतर्गत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्यांचे १० वर्षांपूर्वीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे नीतू सिंग यांनीही हे चॅलेंज स्वीकारत त्यांचे जुने फोटो शेअर केल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2019 1:05 pm