24 January 2020

News Flash

व्हिवा गर्ल गाणार मराठी गीत

आज मराठी सिनेमांचे संगीत चांगलेच गाजत असून मराठी संगीतात नवनवीन प्रयोग केले जात आहेत.

| November 28, 2014 03:05 am

neha-bhasin-1आज मराठी सिनेमांचे संगीत चांगलेच गाजत असून मराठी संगीतात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. ह्या नवीन प्रयोगांकडे पाहता हिंदी गायकांनी अनेक मराठी गीते गायल्याचे दिसून येते. मराठीतील प्रतिभावंत संगीतकार मंडळी हिंदीतील गायकांचे नवनवे चेहरे शोधून त्यांच्या आवाजात अफलातून मराठी गीते रेकॉर्ड करीत आहेत. याच यादीत आता ‘व्हिवा’ या पॉपगर्ल ग्रुप मधील नेहा भसीन हिचा समावेश होणार आहे. गायिका, गीतकार, डान्सर, मॉडेल, सूत्रसंचालन अशा वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये हातखंडा असलेली नेहा आता संगीतकार ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेलं ‘दिल बोले कुडूकु’ या आगामी सिनेमातील गीत गाणार आहे.   
क्षितीज झारापकर दिग्दर्शित आणि मृणाल कपाडिया यांची निर्मिती असलेल्या ‘दिल बोले कुडूकु’ या सिनेमाच्या माध्यमातून नेहा भसीन ही पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी गाणार असून या गीताचे बोल गीतकार अश्विनी शेंडे यांनी लिहिलेले आहेत. याआधी नेहाने हिंदी, तेलगू आणि तमीळ सिनेमांमधील गाणी गायिली आहेत. नेहाबद्दल बोलताना ऋषिकेश म्हणतो की, “नेहाने या सिनेमातील एका क्लब सॉगसाठी आपला आवाज दिला असून तिने ते गाणं भरपूर अ‍ॅटिट्यूड आणि  पॉझिटिव्ह वाईब्सने गायले आहे. तरूणांना हे गाणं आवडेल अशी अपेक्षा आहे”.     
नेहा सांगते की, ” मी गेली १० वर्षे मुंबई शहरात राहत असून मला एकदा तरी मराठी गीत गाण्याची संधी मिळावी अशी माझी खूप ईच्छा होती कारण, मराठी भाषेत एक वेगळंच युनिकनेस आहे. आणि शेवटी माझा संगीतकार मित्र ऋषिकेश कामेरकर याच्यामुळे मला मराठी गीत गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं मस्त झालं असून तरूणांई या गाण्यावर चांगलीच थिरकरणार याची मला खात्री आहे”.

First Published on November 28, 2014 3:05 am

Web Title: neha bhasin viva group fame sings for a marathi film for the first time
Next Stories
1 रहस्य आणि रोमांस यांचा अनोखा प्रवास ‘प्रेमासाठी coming सून’
2 ‘भूमिका साकारणे म्हणजे माझ्यातील ‘मी’चा शोध’
3 मालिकांमधील कलाकारांच्या ‘ग्लॅमर’चा नाटकाला फायदा
Just Now!
X