News Flash

नेहा धूपियाने पुन्हा दिली गुड न्यूज; फोटो शेअर करत म्हणाली…

नेहाने सोशल मीडियावर पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

नेहाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. नेहाने सोशल मीडियावर पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा आणि अंगद अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे. नेहाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

नेहाने दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची गूड न्यूज इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत दिली आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘या फोटोला काय कॅप्शन द्यायचे हा विचार करण्यात दोन दिवस गेले… आम्ही विचार केलेले सर्वात चांगले कॅप्शन म्हणजे.. देवा तुझे आभार’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. नेहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा : …आणि कपाटातून बाहेर निघाला प्रियांकाचा बॉयफ्रेंड

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

४० वर्षांच्या नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १० मे २०१८मध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केले. नेहाने प्रेग्नंट असल्यामुळे अंगदशी लग्न केल्याचे म्हटले जात होते. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर १८ नोव्हेंबर २०१८मध्ये नेहाने एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता नेहा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:56 am

Web Title: neha dhupia and angad bedi announce second pregnancy avb 95
Next Stories
1 ‘डिलिव्हरी रूममध्ये असताना हरभजन काढत होता फोटो; पत्नी गीताने सांगितला किस्सा
2 कान चित्रपट महोत्सव : तीन दशकांत प्रथमच दिग्दर्शिकेस पाम पुरस्कार
3 विक्की कौशलच्या या व्हिडीओवर दीपिका पादुकोणसह इतर सेलिब्रिटींना हसू आवरलं नाही
Just Now!
X