News Flash

‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा ट्रोर्ल्सच्या निशाण्यावर

वाचा, नेमकं काय आहे प्रकरण

‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा ट्रोर्ल्सच्या निशाण्यावर
नेहा धुपिया

अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. बऱ्याचदा ती सामाजिक मुद्द्यांवर तिचं मतही मांडत असते. स्पष्टपणे आपले विचार मांडणारी नेहा सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. ‘रोडीज’मधील एका स्पर्धकाला खडेबोल सुनावल्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

नेहा सध्या छोट्या पडद्यावरील ‘एमटीव्ही रोडीज’ या शोमध्ये परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी “माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलंच झापलं. ‘एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही’, असं नेहा म्हणाली. परंतु तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. ‘प्रत्येक वेळी उपदेशाचे डोस पाजायचे नसतात’, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

“माझ्या प्रेयसीचे पाच प्रियकर होते, हे जेव्हा मला समजलं त्यावेळी मी तिला आणि त्या पाचही जणांना समोरासमोर आणलं आणि सगळ्यांसमोर तिच्या कानशिलात लगावली”, असं या स्पर्धकाने सांगितलं. त्याच्या या वक्तव्यानंतर नेहाने आगपाखड करत, “एका मुलीला मारण्याचा तुला अधिकार नाही. पाच प्रियकरांची निवड करणं हा सर्वस्वी त्या मुलीचा निर्णय आहे”, असं नेहा म्हणाली.

नेहाने या मुलाला खडेबोल सुनावल्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. या मुलाप्रमाणेच अन्य एका महिला स्पर्धकाने तिच्या प्रियकरला मारल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी नेहाने या मुलीला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच नेहाचा हा खोटा फेमिनिझम असल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, नेहा चित्रपटांपासून दूर असली तरी शो, कार्यक्रम यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अलिकडेच ती ‘देवी’ या लघुपटात झळकली होती. या व्यतिरिक्त तिता नो फिल्टर नेहा हा शोदेखील लोकप्रिय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 10:44 am

Web Title: neha dhupia is being slammed for defending a girl who was supposed to be cheating on her boyfriend ssj 93
Next Stories
1 हा तैमुर नाही, मग कोण?; या चिमुकल्याला तुम्हीच ओळखा…
2 तनुश्री दत्तावर २५ कोटींचा मानहानीचा दावा; नाना पाटेकर यांची ‘नाम’ न्यायालयात
3 … तर कंगना अभिनय सोडून देईल; रंगोली चंडेलचं ओपन चॅलेंज
Just Now!
X