25 February 2021

News Flash

अखेर नेहा धुपियाबाबतची ती चर्चा ठरली खरी

सहसा एखाद्या सेलिब्रिटीची लग्न असलं की त्याआधीपासूनच बरेच दिवस त्याच्या तयारीची, पाहुण्यांच्या यादीची विविध कार्यक्रमांची चर्चा होण्यास सुरुवात होते.

नेहा धुपिया

सहसा एखाद्या सेलिब्रिटीची लग्न असलं की त्याआधीपासूनच बरेच दिवस त्याच्या तयारीची, पाहुण्यांच्या यादीची विविध कार्यक्रमांची चर्चा होण्यास सुरुवात होते. पण, अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंदग बेदी यांचा विवाहसोहळा मात्र या साऱ्याला अपवाद ठरला. सोनम कपूरच्या लग्नाच्या चर्चा शमत नाहीत तोच नेहा आणि अंगदने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ बांधल्याचं वृत्त समोर आलं. सोशल मीडियावर या लग्नाविषयी बरीच मतमतांतरं झाल्याचंही पाहायला मिळालं. किंबहुना नेहा गरोदर असल्यामुळेच तिने आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अंगदशी इतक्या घाईने लग्न केल्याचंही म्हटलं गेलं. आता या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या असून नेहा लवकरच आई होणार आहे आणि आता हे जगजाहिर झालं आहे.

खुद्द नेहाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ‘एक नवीन सुरुवात..’ असं कॅप्शन देत नेहाने अंगदसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये नेहाचा बेबी बंप पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंगदनेही नेहाच्या गरोदरपणाविषयी होत असणाऱ्या चर्चा या पूर्णपणे खोट्या असल्याचं छातीठोकपणे सांगितलं होतं.

वाचा : धोनीसोबत डिनरला जाणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी 

नेहा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपविषयीसुद्धा फार कमी लोकांना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांच्या लग्नाचं वृत्तं हे अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेलं. १० मे रोजी दिल्लीत नेहा आणि अंगद विवाहबंधनात अडकले. नेहा ३७ वर्षांची आहे तर अंगद तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजेच ३५ वर्षांचा आहे. अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचा पुत्र आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 7:45 pm

Web Title: neha dhupia pregnant angad bedi shares photos on social media
Next Stories
1 धोनीसोबत डिनरला जाणार बॉलिवूडचे हे सेलिब्रिटी
2 सचिन कुंडलकर, आरोप करायच्या आधी वस्तुस्थिती तर बघा; आदेश बांदेकरांचा सल्ला
3 सनीला अडल्ट फिल्ममध्ये पाहून डॅनियलला काय वाटायचं?
Just Now!
X