हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना रविवारी १८ नोव्हेंबरला कन्यरत्न झालं. या नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद सध्या धुपिया आणि बेदी यांचं कुटुंब सेलिब्रेट करत असून नेहाच्या या चिमुकलीचं नुकतंच नाव ठेवण्यात आलं आहे. नेहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बाळाचं नाव जाहीर केलं आहे. नेहा-अंगदच्या चिमुकलीचं नाव 'मेहेर' असं ठेवण्यात आलं असून नेहाने इन्स्टाग्रामवर चिमुकलीच्या पायांचा एक फोटो शेअर केला आहे. 'मेहेर धुपिया-बेदीकडून सगळ्या चाहत्यांना नमस्कार, मुलीचं नाव मेहेर ठेवलंय', असं कॅप्शन नेहाने या फोटोला दिलं आहे. View this post on Instagram Mehr Dhupia Bedi says hello to the world . A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on Nov 19, 2018 at 11:18pm PST दरम्यान, खारमधील विमेन्स हॉस्पिटलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता या मेहेरचा जन्म झाला. काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये नेहाने तिच्या प्रेग्नसीबाबत एक खुलासा केला. गर्भवती असल्याची गोष्ट सहाव्या महिन्यापर्यंत मी लपवून ठेवली होती. कदाचित मी गर्भवती असल्याचं समजताच मला कोणीही काम देणार नाही माझ्याबद्दल चुकीचं मत बनवतील अशी भीती मला सारखी वाटायची म्हणूनच मी बातमी लपवून ठेवली होती असं तिनं कबुल केलं.