News Flash

नेहा धूपियाने लग्नाआधी केलं होतं ‘या’ तिघांना डेट

नेहाने १० मे २०१८मध्ये अंगदशी लग्न केले

नेहा धूपिया

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नेहा धूपिया आज २७ ऑगस्ट रोजी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाने तिच्या करिअरमध्ये हिंदी, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्याचबरोबर नेहाने २००२ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया पेजेंट’चा खिताब जिंकला होता. ‘कयामत’ या चित्रपटातून नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. नेहाचा जन्म कोचीमधील शीख परिवारामध्ये झाला. तिचे वडिल प्रदीप सिंह धूपिया भारतीय नौदलात रुजू असल्याने नेहाने शालेय शिक्षण ‘सैनिकी शाळे’मध्ये झाले. त्यानंतर तिने दिल्लीमधील एका कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले.

नेहाने एमटीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सविला’ मध्ये परिक्षक म्हणून काम केले. नेहाने बॉयफ्रेंड अंगद बेदीसह गुपचूप लग्न करताच नेहा चर्चेचा विषय झाली होती. नेहाने १० मे २०१८मध्ये अंगदशी लग्न केले. अंगद आणि नेहाच्या नात्याच्या चर्चा अंगदने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोपासून सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अंगदने ‘तुम्हारी सुल्लू’ चित्रपटातील नेहाच्या अभिनयाची प्रशंसा करताच त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण मिळाले होते.

अंगद बेदीआधी नेहाचे नाव तीन व्यक्तींसोबत जोडण्यात आले होते. रित्विक भट्टाचार्य, युवराज सिंग आणि जेम्स सिल्वेस्टरसोबत नेहा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. रित्विक एक स्क्वॅश खेळाडू आहे. नेहा आणि रित्विक १० वर्षे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. पंरतु २०१०मध्ये अखेर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला. त्यानंतर रित्विकने मॉडेल पिया त्रिवेदीसोबत लग्न केले. २०१४मध्ये नेहा आणि भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघांना अनेक वेळा एकत्र डिनर डेट आणि फिरताना पाहिले होते. पण नेहाने या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते.

या सर्व चर्चांनंतर नेहाच्या आयुष्यात मिस्ट्री मॅन जेम्स सिल्वेस्टरची एण्ट्री झाली. जेम्स हा मुळचा व्हेनेझूएलाचा असून पेशाने दंतचिकित्सक होता. मात्र नेहा आणि जेम्सचे नाते फार काळ टिकले नाही.

सध्या नेहा तिचा वाढदिवस मालदिवला साजरा करत आहे. नेहाला एक मुलगी देखील आहे. तिचे नाव ‘मेहर’ असे आहे. आता ती ९ महिन्यांची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 11:50 am

Web Title: neha dhupiya before marriage affairs avb 95
Next Stories
1 पहिल्याच भेटीत राज कपूर यांच्यावर का चिडल्या होत्या साधना?
2 निक जोनासने स्वत:ची तुलना केली या बॉलिवूड अभिनेत्यासह
3 रानू मंडल यांना प्रसिद्धी मिळताच १० वर्षांनंतर परतली मुलगी
Just Now!
X