बॉलिवूडमध्ये आपल्या गाण्यांने अनेकांच्या मनावर राज्य करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. आज नेहाचा ३२वा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेहाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. तसेच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

नुकताच नेहाचा डान्स करतानाचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘आंख मारे’ या गाण्यावर कोरिओग्राफर मेल्विन लुइससोबत थिरकताना दिसतेय. तिचा व्हिडीओमधील जलवा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहे. नेहाचा डान्स पाहण्यासारखा आहे.

नेहाचा जन्म ऋषिकेश येथे झाला. त्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये आले. नेहा ऋषिकेशमध्ये एका लहान घरात भाड्याने राहत होती. आज तेथे तिने आलिशान बंगला खरेदी केला आहे. काही दिवसांपूर्वी नेहाची एक मुलाखत चर्चेत होती. या मुलाखतीमध्ये तिने माझे यश पाहून अनेकजण माझ्यावर जळतात असे म्हटले होते. तसेच तिने लहान पणीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. ‘मी चार वर्षांची असताना गाणे गाण्यास सुरुवात केली होती. वयाच्या १६ वर्षांपर्यंत मी भजन गात होते. जर तुम्ही माझ्या जागरणाचे फुटेज पाहिले तर तेथे देखील मी एका लहान मुलाप्रमाणे नाचत भजन गाताना दिसेल’ असे तिने म्हटले होते.