28 November 2020

News Flash

नेहा कक्कर दिसणार पुन्हा एकदा ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या मंचावर

जाणून घ्या कधी

नेहा कक्कर

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोने लॉकडाउननंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १८ जुलै रोजी पुन्हा सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा नवा भाग असो किंवा गेल्या आठवड्यामधील पौराणिक विशेष भाग असो, त्यातील गुणी बालस्पर्धकांनी अप्रतिमपणे सादर केलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. पण आता या आठवड्यात प्रेक्षकांना एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या विशेष भागात लोकप्रिय गायक नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि सोनू कक्कर हे सहभागी होणार असून ते या स्पर्धकांना प्रोत्साहन देणार आहेत. दरम्यान नेहाने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या २०१७ मधील पर्वामध्ये प्रथमच नेहाबरोबर हिमेश रेशमिया आणि जावेद अली हे परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. आता प्रदर्शित होणाऱ्या या विशेष भागात या तिन्ही परीक्षकांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. त्यामुळे नेहा कक्कर भारावून गेली होती. खरे तर त्यावेळी नामवंत गायिका अलका याज्ञिक या परीक्षक म्हणून काम पाहात होत्या. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना शोमधून बाहेर पडावे लागले होते. तेव्हा त्यांच्या जागी नेहा कक्कर परीक्षक म्हणून सहभागी झाली होती.

आता २०१७ मधील हे तिन्ही परीक्षक पुन्हा एकदा एकत्र आल्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या दोन्ही परीक्षकांबरोबर केलेली धमालमस्ती या सर्व गोष्टींची नेहमीच खूप आठवण येत असल्याचे नेहाने सांगितले. आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या नव्या भागात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून सहभागी होत असल्याबद्दल नेहा कक्कर म्हणाली, “मी माझ्या घरी परतले आहे असंच वाटत आहे. मला सा रे ग म प लिटल चॅम्प्सच्या सेटची खूप आठवण येत होती, पण आता आम्ही पुन्हा एकत्र आल्याचे पाहून मी अगदी भारावून गेले आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 4:21 pm

Web Title: neha kakkar again see in sa re ga ma pa little champ avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस’मध्ये जाणार का? तारक मेहता फेम मुनमुन म्हणाली…
2 बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्षमानसी’ कवितेला स्वप्नील बांदोडकरच्या आवाजाचा नवा साज
3 ‘इंडस्ट्रीमध्ये रियासारखे अनेक लोक ब्लॅकमेल करून…’; नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भावाचं ट्विट
Just Now!
X