आपल्या मधूर आवाजाने श्रोत्यांना भूरळ घालणारी गायिका नेहा कक्कड गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीला नेहा डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळाल्या. हे दोघे एकत्र गाण्याच्या अल्बममध्येसुद्धा झळकले होते. नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १०’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक आहे. या शोच्या सेटवर नेहाने तिच्या प्रेमाची कबुली दिली.
‘इंडियन आयडॉल’च्या ‘शादी स्पेशल’ भागात अचानक येऊन हिमांशने नेहाला सुखद धक्का दिला. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनीच हिमांशला आमंत्रित केले होते. सोशल मीडियावर अनेकदा नेहा आणि हिमांशचे एकत्र फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. पण प्रसारमाध्यमांसमोर दोघांनी कधीच रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमांशच्या ‘यारियाँ’ चित्रपटात नेहाने ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गाणं गायलं होतं. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी हे दोघे भेटले होते. ‘हिमांश माझा फक्त मित्र नाही तर त्याहीपेक्षा जास्त आहे’, असं नेहाने ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर म्हटलं. ‘हिमांशइतका मला चांगल्याप्रकारे मला कोणीच ओळखू शकत नाही. मी फक्त त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार करू शकते,’ असंही ती पुढे म्हणाली.

वाचा : महेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केली अनूप- जसलीनसोबत तुलना

हिमांशनेही खास अंदाजात आपल्या प्रेमाची कबूली दिली. ‘प्रेमाची सुरुवात ही मैत्रीपासून होते आणि नेहा माझ्यासाठी मैत्रिणीपेक्षा जास्त आहे. तिच्याकडून ही कबुली ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो.’ हिमांश कोहलीने ‘हमसे है लाईफ’ या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘यारियाँ’ या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात हिमांश बालकलाकार असताना झळकला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar and her rumoured beau himansh kohli finally confirm their relationship on the sets of indian idol
First published on: 22-09-2018 at 10:52 IST