आपल्या मधूर आवाजाने श्रोत्यांना भुरळ घालणारी गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीला नेहा डेट करत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या. हे दोघे एकत्र गाण्याच्या अल्बममध्येसुद्धा झळकले होते. नेहा सध्या ‘इंडियन आयडॉल १०’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक आहे आणि या शोच्या सेटवरच नेहाने तिच्या प्रेमाची कबुली दिली. मात्र आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समजतंय.

हिमांशने काही दिवसांपूर्वीच ‘इंडियन आयडॉल’च्या ‘शादी स्पेशल’ भागात अचानक येऊन नेहाला सुखद धक्का दिला होता. यावेळी दोघांनीही खुलेपणाने प्रेम व्यक्त केलं. सोशल मीडियावर फोटो, पोस्टच्या माध्यमातूनही दोघं एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळतात. ‘हिमांशइतका मला चांगल्याप्रकारे मला कोणीच ओळखू शकत नाही. मी फक्त त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार करू शकते,’ असं म्हणत तिने लग्नाचेही संकेत दिले होते. पण आता नेहा आणि हिमांश दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केलं आहे. इतकंच नव्हे तर नेहाने हिमांशसोबतचे बरेचसे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केले आहेत.

https://www.instagram.com/p/Bp35PU3hAAJ/

Video : पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले’?

हिमांशच्या ‘यारियाँ’ चित्रपटात नेहाने ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गाणं गायलं होतं. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी हे दोघे भेटले होते. हिमांश कोहलीने ‘हमसे है लाईफ’ या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘यारियाँ’ या चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.