बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका नेहा कक्करने काही दिवसांपूर्वी रोहनप्रीत सिंहशी लग्न केले. रोहन देखील गायक आहे. ते दोघेही सतत एकत्र वेळ घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच नेहाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे भांडताना दिसत आहेत. पण खरच त्यांच्यामध्ये भांडण झाले आहे की नेहा आगामी गाण्याचे प्रमोशन करत आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर रोहन प्रीत सिंहसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहन नेहाला मस्करीमध्ये मारताना दिसत आहे आणि नेहाला रोहनचा प्रचंड राग येतो. रागाच्या भरात नेहा रोहनला मारताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये गाणे ऐकू येत आहे.

आणखी वाचा : कोविड सेंटरसाठी बिग बींचा पुढाकार; केली इतक्या कोटींची मदत

हा व्हिडीओ शेअर करत नेहाने #KhadTainuMainDassa असे म्हटले आहे. नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून नेहा तिच्या आगामी गाण्याचे ‘खढ़ तैनू मैं दस्सा’ प्रमोशन करत असल्याचे म्हटले जात आहे. हे गाणे नेहा आणि रोहने गायले आहे.

काही दिवसांपूर्वी नेहाने या गाण्याचे पोस्टर शेअर करत “माझे आणि रोहनप्रीतचे आगामी गाणे ‘खढ़ तैनू मैं दस्सा’चे पहिले पोस्टर” या आशयाचे कॅप्शन दिले होते. या पोस्टरमध्ये ते दोघेही फुटबॉलच्या मैदानात उभे असल्याचे दिसत आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन अगम-अजीमने केले आहे.