बॉलिवूड गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. सध्या ती सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. नुकताच नेहाला यूट्यूबकडून डायमंड अवॉर्ड मिळाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेहाने याबाबत माहिती दिली आहे.
नेहा कक्कर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळेत. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच नेहाने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये नेहाच्या हातात एक अवॉर्ड असल्याचे दिसत आहे. नेहाला हा अवॉर्ड यूट्यूबकडून मिळाला असून हा यूट्यूबचा डायमंड अवॉर्ड आहे.
View this post on Instagram
नेहाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत, ‘भारतातील पहिली गायिका जिला यूट्यूबचा डायमंड अवॉर्ड मिळाला आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला नसता तर हे शक्य झाले नसते. आई, बाबा, भाऊ टोनी आणि तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा दिल्यामुळे तुमचे आभार’ असे कॅप्शन दिले आहे. नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट कर शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 3:45 pm