बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर लवकरच लग्न बंधनात अडकणार असे म्हटले जात आहे. नेहा गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहा किंवा रोहनप्रीतने या सर्व चर्चांवर अद्याप वक्तव्य केलेले नाही. आता नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांशू कोहलीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच टाइम्स ऑफ इंडियाने हिमांशूशी संवाद साधल. त्यावेळी त्याने नेहा जर लग्न बंधनात अडकणार असेल तर मी तिच्यासाठी आनंदी आहे असे म्हटले आहे. ‘जर नेहा लग्न बंधनात अडकणार असेल तर मला आनंदच होईल. ती जुन्या गोष्टी विसरून तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. तिच्या आयुष्यात दुसरी कोणी तरी व्यक्ती आली आणि नेहा त्याच्यासोबत आनंदी आहे हे पासून मला आनंद झाला आहे’ असे हिमांशू म्हणाला.

आणखी वाचा: नेहा कक्कर अडकणार लग्न बंधनात? जाणून घ्या त्या व्यक्तीविषयी…

नेहा करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे. ती २४ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. रोहनप्रीत आणि नेहाने नुकताच एका म्यूजिक अल्बममध्ये एकत्र काम केले होते.

रोहनप्रीत एक गायक आहे. त्याने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्याचे म्हटले जाते.