News Flash

अरेच्चा हे काय! लग्नात नेहाने केलं ‘या’ अभिनेत्रींना कॉपी?

...म्हणून लग्नसोहळ्यातील 'त्या' फोटोमुळे नेहा झाली ट्रोल

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा अखेर पार पडला आहे. २४ ऑक्टोबर रोजी या दोघांनी सातजन्माच्या गाठी बांधल्या असून सध्या सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. यात नेहाने लग्नात परिधान केलेले कपडे सध्या चांगलेच चर्चिले जात असून अनेकांनी तिला ट्रोलदेखील केलं आहे. नेहाने बॉलिवूड अभिनेत्रींना कॉपी करुन तिच्या लग्नातील कपड्यांची निवड केल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहाच्या लग्नातील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यात तिच्या हळदी समारंभापासून ते लग्नानंतरच्या रिसेप्शनपर्यंत अनेक फोटोंचा समावेश आहे. विशेष म्हणजे नेहाने लग्नातील कपडे डिझाइन करताना अभिनेत्री अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांना कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.

नेहाने परिधान केलेला लाल रंगाचा लेहंगा हा हुबेहूब अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वेडिंग लेहंगाप्रमाणेच दिसत आहे. त्यामुळे नेहाने हा लेहंगा डिझाइन करताना प्रियांकाला कॉपी केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

नेहा आणि रोहनप्रीत यांनी दिल्लीत गुरुद्वारामध्येदेखील पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. यावेळी नेहाने परिधान केलेला लेहंगा अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लेहंग्याप्रमाणेच दिसत होता. अनुष्का शर्माने तिच्या लग्नात परिधान केलेला लेहंगा हा गुलाबी रंगाचा असून तो चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरला होता. इतकंच नाही तर रोहनप्रीत आणि नेहाने लग्नानंतर केलेलं फोटोशूटदेखील अनुष्का-विराटप्रमाणे असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. नेहा आणि अनुष्का या दोघींचेही लेहंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांनी डिझाइन केले आहेत.

दरम्यान, नेहाने तिच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. मात्र, तिने परिधान केलेला लेहंगा आणि तिचा एकंदरीत लूक हा हुबेहून दीपिका पदुकोणप्रमाणे भासत होता. दीपिकाने तिच्या रिसेप्शन पार्टीमध्येदेखील पांढऱ्या रंगाचा लेहंगा, डोक्यावर दुपट्टा आणि हलकासा मेकअप केली होता. अगदी त्याचप्रमाणे नेहाचादेखील लूक असल्याचं दिसून आलं.

 

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा चांगलीच ट्रोल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 1:49 pm

Web Title: neha kakkar gets trolled for copying anushka sharma priyanka chopra and deepika padukone wedding looks ssj 93
Next Stories
1 ‘कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा…’, मोहब्बतेमधील ऐश्वर्याबाबत फराह खानने केला खुलासा
2 “इथे केलेला कचरा सोबत घेऊन जा”; गोव्याच्या मंत्र्यांचा करण जोहरला दम
3 जान कुमारच्या आईनंही मागितली मराठी भाषिकांची माफी; म्हणाल्या, “माझ्या मुलाला…”
Just Now!
X