11 August 2020

News Flash

अन् नेहा कक्करनं दिली दोन-दोन हजारांच्या नोटेची भीक

दानशूर नेहा कक्करने भीक मागणाऱ्या मुलांना वाटल्या दोन हजारांच्या नोटा

बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती गरीब मुलांना चक्क दोन हजार रुपयांच्या नोटा वाटताना दिसत आहे.

अवश्य वाचा – स्लिम झाली अन् अडचणीत आली; सारा अली खानला नवा ताप

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” ब्रेकअप करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडचे भन्नाट उत्तर

नेहाने का वाटले पैसे?

नेहा हॉटेलमधून बाहेर पडत होती. त्याचवेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी घोळका केला. या घोळक्यात काही गरीब मुलं देखील होती. त्यांनी तिच्याकडे पैसे मागितले. या गरीब मुलांची नेहाला दया आली. परिणामी तिने त्या मुलांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल जोरदार व्हायर होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नेहाच्या दिलदारपणाची स्तुती देखील केली आहे.

अवश्य पाहा – ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

यापूर्वी नेहा तिच्या भावामुळे चर्चेत होती. ती आपल्या भावासोबत एक टिक-टॉक बनवत असताना त्याने तिचे केस ओढले. परिणामी चिढलेल्या नेहाने त्याला थोबाडीत मारली होती. हा व्हिडीओ देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 5:24 pm

Web Title: neha kakkar gives 2 thousand rupees to kids mppg 94
Next Stories
1 अग्गंबाई सासूबाई : शुभ्रा-सोहमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री
2 स्लिम झाली अन् अडचणीत आली; सारा अली खानला नवा ताप
3 ‘खऱ्या कलेला डावललं’; नेटकऱ्यांनी उपसलं #BoycottFilmFare चं अस्त्र
Just Now!
X