‘इंडियन आयडल’ या शोने आजवर अनेक गायकांना देशातील मोठे गायक बनवले आहेत. या नवीन सत्रामध्ये देखील प्रेक्षकांचे संगीताबद्दलचे प्रेम अधिक वाढावे यासाठी इंडियन आयडलने पूर्ण तयारी केली आहे. या सत्रातील स्पर्धक तर अत्यंत प्रतिभावान आहेत. या वीकएंडला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील प्यारेलाल जी हजेरी लावणार आहेत.

इंडियन आयडल टीमने याच कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांना देखील आमंत्रित केले आहे. संतोष आनंद यांनी प्यारे लालजींसोबत काम केलेले आहे. त्यांनी सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याचे शोमध्ये सांगितले आहे. त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाबद्दल ऐकून शोची परिक्षक नेहा कक्करला खूप वाईट वाटले आणि तिने संतोष जींना ५ लाख रुपये देण्याचे ठरवले. तिच्या मते संतोष जी हे संगीत उद्योगातील एक महत्त्वाचे नाव आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करण्याची तयारी तिने दर्शवली. त्यांची कहाणी ऐकून ती भावुक झाली आहे.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
delhi farmer protest marathi news, trolley times newspaper marathi news, trolley times newspaper delhi farmers protest marathi news
ना ऑफिस, ना प्रेस… ट्रॅक्टरमधून निघणारं जगावेगळं वृत्तपत्र…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
who supports mephedrone drugs marathi news, trading of mephedrone drugs marathi news, mephedrone drugs article pune marathi news
अमली पदार्थांच्या व्यापाराला कुणाचा पाठिंबा?

नेहाने भारतीय मनोरंजन उद्योगाला देखील संतोषजींना काम देण्यासाठी आवाहन केले. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना ५ लाख रुपये देत आहोत असे ती म्हणाली. इतकेच नाही, तर विशाल दादलानी यांनीही संतोषजींना त्यांची काही गाणी देण्याची विनंती केली जी रिलीज करण्याची जबाबदारी विशाल दादलानीने दर्शवली. नेहाने “एक प्यार का नग्मा” गीत म्हटले आणि संतोषजींनी देखील तिच्या सोबत काही ओळी म्हटल्या.