News Flash

Video: नेहा कक्करने असे काय केले की अनू मलिकने स्वत:च्याच कानशिलात लगावली

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून नेहा कक्कर ओळखली जाते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आज नेहाची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. पण नेहाचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. तिने सुरुवातीला अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सध्या सोशल मीडियावर नेहाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहाचे गाणे ऐकून गायक अनू मलिक यांनी स्वत:च्या कानशिलात लगावली आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा ‘इंडियन आयडल’ शोमध्ये ऑडिशन देत असल्याचे दिसत आहे. तिचे गाणे ऐकून तेथे उपस्थित असलेले परिक्षक अनू मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांच्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : ही गोड मुलगी करतेय प्रेक्षकांच्या मनावर राज्य; ओळखलं का ‘या’ अभिनेत्रीला?

दरम्यान, अनु मलिक नेहा कक्करचे गाणे ऐकून ‘तू असे कसे गाणे गाते, मला स्वत:च्या कानशिलात लगावायची इच्छा झाले’ असं बोलतो. त्यानंतर तो स्वत:च्या कानाखाली मारुन घेतो. व्हिडीओ अर्ध्यावर कट झाल्यामुळे अनु मलिकने अशा प्रकारे का प्रतिक्रिया दिली? नेमकं काय झालं? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. पण असे म्हटले जात आहे की नेहाने गाणे चांगले गायल्यामुळे अनु मलिकने तिला घाबरवण्यासाठी हे केले होते. अनु मलिक अनेकदा स्पर्धकांना घाबरवत असल्याचे पाहायला मिळते.

सध्या नेहा याच शोमध्ये एक परिक्षक म्हणून काम करत आहे आणि त्यासाठी ती चांगले मानधन देखील घेत आहे. नेहाची काला चश्मा, दिलबर, आंख मारू आणि इतर गाणी सुपरहिट ठरली होती. आज नेहा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 5:12 pm

Web Title: neha kakkar indian idol audition video anu malik slap himself avb 95
Next Stories
1 ‘मंगलाष्टक रिटर्न’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 “Introducing Babil Khan…”,इरफान खान यांच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण!
3 ‘आईला आमच्या आधी एक मुलं होते पण…’, कंगनाने शेअर केले बालपणीचे फोटो
Just Now!
X