07 March 2021

News Flash

प्रेग्नंसीचा ड्रामा उघड! नेहाने ‘त्या’ फोटोवर केला खुलासा

हे आहे नेहाच्या 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

नेहामुळे लग्नाआधी गर्भवती राहिलेल्या बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींची चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री.

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने शुक्रवारी नवरा रोहनप्रीत सिंहसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत होतं. त्यामुळे नेहा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तसंच नेहा लग्नापूर्वीच गरोदर होती, असंही म्हटलं जात होतं. मात्र, आता नेहाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नेहा खरोखरच प्रेग्नंट नसून तिने हे सारं तिच्या आगामी गाण्यासाठी केल्याचा खुलासा तिने स्वत: केला आहे.

नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एक नवीन चर्चा सुरु झाली आहे.


नेहाच्या आगामी गाण्याचं नाव ‘खयाल रख्या कर’ असं असून हे गाणं २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

दरम्यान, १८ डिसेंबरला नेहाने रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसत होतं. त्यासोबतच तिने खयाल रख्या कर असं कॅप्शन दिलं होतं. तर रोहनप्रीतनेदेखील “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट केली होती. त्यामुळे नेहा गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नेहाने तिच्या पोस्टमध्ये ती प्रेग्नंट असल्याचा उल्लेख कुठेही केला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 1:57 pm

Web Title: neha kakkar is not pregnant announces new song with husband rohanpreet singh ssj 93
Next Stories
1 “पालकांनी काही संस्कार केले की नाही?”; राखीच्या शिव्या ऐकून निक्कीची आई संतापली
2 सनासारख्या फ्लॉप अभिनेत्रीसोबत लग्न का केलं?; अनसने ट्रोलर्सला दिलं जोरदार प्रत्युत्तर
3 रितेशच्या ४० व्या वाढदिवशी जेनेलियाने दिलं होतं हे ‘लय भारी’ गिफ्ट; फोटो पाहून फिटतील डोळ्याची पारणं
Just Now!
X