28 May 2020

News Flash

Indian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते ‘इतके’ मानधन

ही रक्कम ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल

सोनी वाहिनावरील ‘इंडियन आयडल’ पर्व ११ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशातील अनेक लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शोच्या मंचावर परफॉर्म करत आहेत. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. पण हेच परिक्षक एका भागासाठी किती मानधन घेतात असा प्रश्न अनेकांना पडतो.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नेहा कक्कर विशाल दादलानी आणि अनु मलिक यांच्या पेक्षा जास्त मानधन घेते. इंडियन आयडलच्या प्रत्येक भागासाठी नेहा पाच लाख रुपये मानधन घेते. विशाल दादलानी एका भागासाठी साडे चार लाख रुपये मानधन घेतात तर अनु मलिका चार लाख रुपये मानधन घेतात. स्पर्धकांचे इतके मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल.

आणखी वाचा : नेहा कक्करच्या ‘इमोशन’वर नेटकऱ्यांनी पाडला ‘मीम्स’चा पाऊस

नेहा कक्कर ऐवजी इंडियन आयडल ११ साठी नीता मोहनची परिक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नेहा कक्करचा मोठा चाहता वर्ग पाहता तिची निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. या शोचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. आदित्य प्रत्येक एपिसोडसाठी अडीच लाख रुपये मानधन घेतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 5:01 pm

Web Title: neha kakkar is taking huge amount for indian idol season 11 avb 95
Next Stories
1 ‘तेरा इमोशनल अत्याचार’ गाण्यामधील हा अभिनेता कोण आहे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल
2 ‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहिम
3 ..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात
Just Now!
X