27 February 2021

News Flash

‘लूडो खेलूंगी’ वर थिरकणाऱ्या नेहाचा व्हिडिओ व्हायरल

यावेळी तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईसदेखील थिरकताना दिसत आहे.

संगीत क्षेत्रातील एक सुरेल आवाज म्हणजे गायिका नेहा कक्कर. आपल्या आवाजामुळे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नेहाने आतापर्यंत अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे. यापैकी ‘काला चश्मा’, ‘कर गई चुल’, ‘लंडन ठुमकदा’ ही तिची गाणी तुफान गाजली. विशेष म्हणजे संगीत क्षेत्रात वावरणाऱ्या नेहाच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नेहा ‘लूडो खेलूंगी’ या गाण्यावर थिरकत असून तीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यावेळी तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईसदेखील थिरकताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नेहाचा हा डान्स पाहता ती नृत्यकौशल्यात पारंगत असलेल्या एखाद्या नर्तकीसारखी प्रत्येक स्टेप करत आहे. या डान्सचा व्हिडिओ नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओ १४ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर व्हिडिओमधील ‘लूडो खेलूंगी’ हे गाणं नेहाचा भाऊ टोनी कक्कडने गायलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 2:28 pm

Web Title: neha kakkar ludo viral dance video with melvin louis
Next Stories
1 जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड
2 Video : भावनाविवश करणारं ‘नैन न जोडी’ एकदा पाहाच
3 तनुश्रीने माध्यमांऐवजी आधी पोलिसांकडे तक्रार करावी: गृहराज्यमंत्री केसरकर
Just Now!
X