गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा कक्कर लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. नेहा २४ ऑक्टोबर रोजी गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता नेहाने यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

नुकताच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा आणि रोहनप्रीत एकत्र असून दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत नेहाने तू माझा आहेस असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

You’re Mine @rohanpreetsingh #NehuPreet

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

नेहाच्या या फोटोवर रोहनप्रीतने कमेंट केली आहे. कमेंटमध्ये त्याने ‘आय लव्ह यू नेहा. मी फक्त तुझाच आहे. माझे संपूर्ण आयुष्य तू आहेस’ असे म्हटले असून हार्ट असलेले इमोजी वापरले आहेत.

येत्या २४ ऑक्टोबरला नेहा दिल्लीमध्ये लग्न करणार आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना नेहा लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच नेहाचा रोका झाल्याचे देखील म्हटले जात आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.

कोण आहे रोहनप्रीत?
रोहनप्रीत एक गायक आहे. त्याने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.