07 March 2021

News Flash

नेहा कक्करने केला नवा विक्रम, जगभरातील गायिकांना टाकले मागे

तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहा कक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता एका वेगळ्या कारणासाठी ती चर्चेत आहे. नेहाने जगभरातील टॉप सिंगरला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.

नुकताच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने जगभरात यूट्यूबवर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या गायिकांची यादी शेअर केली आहे. या टॉप १० गायिकांच्या यादीमध्ये नेहा कक्कर दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेहाचे चाहते प्रचंड आनंदी असल्याचे दिसत आहेत. नेहाने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Ex acts chArt ने २०१९ मधील यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या जगभरातील टॉप १० गायिकांची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये गायिता Cardi Bने ४.८ बिलियन व्ह्यूज यूट्यूबर मिळाले असून तिने पहिले स्थान पटकावले आहे. तर नेहा कक्करला ४.५ बिलियन व्ह्यूज मिळाले असून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेहाने कि केरल जी, ब्लॅकपिंक, सेलेना गोम्ज, बिली एलिस यांना मागे टाकल्यामुळे चाहते फार आनंदी असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 6:10 pm

Web Title: neha kakkar on becoming the second most watched female star on youtube avb 95
Next Stories
1 प्रवीण तरडेचा ‘बॉलिवूड पॅटर्न’; सलमानसोबत शेअर करणार स्क्रीन
2 वरुणमुळे इस्रायलला मिळाली करोनाशी लढण्याची प्रेरणा; ‘हा’ डायलॉग ठरला कारणीभूत
3 इस्रायलकडून वरुण धवनच्या टि्वटची दखल, लसीच्या शोधाचं थेट ABCD 2 शी जोडलं कनेक्शन
Just Now!
X