सध्या सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ पर्व ११ चर्चेत आहे. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. पण सर्वांचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे नेहा कक्करने. सध्या नेहा तिच्या गाण्यांपेक्षा जास्त ‘Oops moment’ मुळे चर्चेत आहे. रविवारी प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये नेहा कक्करसोबत स्टेजवर विचित्र घटना घडली. शोचा सूत्रसंचालक आदित्य नारायणसोबत डान्स करत असताना नेहा खाली पडते.

रविवारी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये इंडियन आयडलचा स्पर्धक निधी कुमार नेहाला डान्स करण्यासाठी मंचावर बोलवतो. त्याच्या विनंतीचा मान ठेवत नेहा मंचावर डान्स करणास येते. मात्र नेहा तिच्यासोबत आदित्यला देखील डान्स करण्यास सांगते. आदित्य नेहासारखा डान्स करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान नेहा आणि आदित्य डान्स करत असताना आदित्यला नेहाला सांभाळता येत नाही आणि नेहा मंचावर खाली पडते. आदित्य नेहाची माफी मागतो. हा व्हिडीओ सोनी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी इंडियन आयडलच्या ऑडिशमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची झलक दाखवण्यात आली होती. दरम्यान नेहा कक्करचा एक चाहता तिच्यासाठी काही गिफ्ट घेऊन शोच्या मंचावर येतो. तो एक-एक करुन नेहाला गिफ्ट देतो. ते पाहून नेहा आनंदी होते आणि त्या स्पर्धकाला मिठी मारते. अचानक तो स्पर्धक कोणताही विचार न करता नेहाच्या गलावर किस घेतो. आदित्य नारायण स्पर्धकाला थांबवतो आणि नेहा देखील तेथून बाजूला होते. ते सर्व पाहून परीक्षक विशाल दादलानी आणि अनु मलिका देखील हैराण होतात.