News Flash

नेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ...

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायिका नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंहसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करत आहे. नेहा होळी साजरी करण्यासाठी संपूर्ण कुटुंबीयांसोबत ऋषिकेश येथे पोहोचली आहे. नुकताच नेहाने सोशल मीडियावर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी साजरी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कुटुंबीयांसोबत स्विमिंग पूलमध्ये मजामस्ती करताना दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये नेहासोबत तिचा पती रोहनप्रीत सिंह, भाऊ टोनी कक्कर आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. ‘तेरा सूट’ हे गाणे देखील सुरु असल्याचे दिसत आहे.

बुधवारी नेहा रोहनप्रीतसोबत होळी साजरी करण्यासाठी ऋषिकेश गेली. तिकडे पोहोचल्यावर गुरुवारी रात्री नेहा पतीसोबत सासरी गेली. आता २८ मार्च रोजी नेहा पुन्हा ऋषिकेशला येणार आहे. २९ मार्चला ती गंगानगर येथील तिच्या घरी राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 1:07 pm

Web Title: neha kakkar share pre holi fun in pool with rohanpreet singh avb 95
Next Stories
1 ‘बोल्ड सीन देण्यास माझा नकार नाही, पण…’, नेहा पेंडसेचा खुलास
2 अनिल कपूर यांनी पत्नीला दिली ‘ही’ महागडी कार गिफ्ट; किंमत आहे…
3 वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनुष्काने शेअर केला वामिकासोबतचा खास फोटो
Just Now!
X