News Flash

नेहा कक्करने शेअर केला ‘First Kiss’चा व्हिडीओ, पाहून पती म्हणाला…

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ते सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. बऱ्याच वेळा ती तिच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच खासगी आयुष्याविषयी देखील बोलताना दिसते. तिने तिच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण आता नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रॅपर हनी सिंगचे गाणे ‘फर्स्ट किस’वर लिपसिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा अतिशय क्यूट दिसत आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये हॅशटॅग वापरत ‘हनी सिंगचे गाणे, फर्स्ट किस’ असे म्हटले आहे. त्यासोबतच आगीचे इमोजी वापरले आहेत.

नेहाच्या या व्हिडीओवर हनी सिंगने कमेंट केली आहे. त्याने ‘खूप प्रेम आणि धन्यवाद’ असे म्हटले आहे. तर नेहाचा पती रोहनप्रीत सिंहने देखील कमेंट करत नेहाची प्रशंचा केली आहे. त्याने ‘शोना बाबू’ असे कमेंटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 1:52 pm

Web Title: neha kakkar shares lip sync video on honey singh song first kiss avb 95
Next Stories
1 गोविंदावरुन टोमणा मारताच कृष्णा अभिषेक म्हणाला…
2 कपड्यांमुळे ट्रोल करणाऱ्यांवर भडकली सोना मोहापात्रा, म्हणाली…
3 मिक्का सिंगचा कंगनावर निशाणा, ‘बेटा कंगना, तू करण आणि हृतिक……’
Just Now!
X