19 September 2020

News Flash

नेहा कक्करने अनोख्या पद्धतीने दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे

बॉलिवूडमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने अनेकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे नेहा कक्कर. नेहा कक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच नेहाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नेहा तिच्या चाहत्यांना गणेशोत्सावाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माझ्या सर्व चाहत्यांना गणेशोत्सावाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की नेहमी स्वत: आनंदी रहा आणि इतरांना देखील आनंदात ठेवा. चांगल्या गोष्टी करण्यासाठी संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. चुकीच्या गोष्टी करण्यात कधीच आनंद नसतो आणि अशा गोष्टीमधून तुम्हाला देखील आनंद मिळणार नाही’ असा संदेश नेहा व्हिडीओमधून चाहत्यांना देत आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Ganesh Chaturthi!! Khushiyaan Baato #NehaKakkar

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

दरम्यान नेहाने अनोखे कॅमेरा फिल्टर वापरल्याचे दिसत आहे. नेहाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी तिला गणेशोत्सवाच्या शुभेच्छादेखील दिल्या आहे.

काही दिवसांपूर्वीच नेहाचा ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत होती. आता पुन्हा एकादा नेहा इंडियन आयडल १० चा स्पर्धक विभोर पराशरसह रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र नेहाने या सर्व चर्चांवर वक्तव्य करत चर्चांना पूर्ण विराम लावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 6:03 pm

Web Title: neha kakkar wishes his fan by sharing video avb 95
Next Stories
1 Article 370 : ओमर अब्दुल्लांची सुटका करा; पूजा बेदीचे पंतप्रधानांना आवाहन
2 Video : सिंगापुरमधील मादाम तुसाँमध्ये श्रीदेवींचा मेणाचा पुतळा, पाहा पहिली झलक
3 Video : रणवीरच्या पहिल्या म्युझिक अल्बममधील ‘हे’ गाणं बाप्पाला समर्पित
Just Now!
X