News Flash

नेहाचा हॉट डान्स झाला व्हायरल; पाहा थ्रो-बॅक व्हिडीओ

हा व्हायरल झालेला व्हिडीओ नेहाच्या फॅनक्लबने शेअर केला आहे.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नेहा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असल्याचे दिसते. नुकताच नेहाचा एक थ्रो बॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ नेहाच्या फॅनक्लबने शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. नेहा मनाली ट्रान्स या गाण्यावर लाइव्ह परफॉम करताना दिसत आहे. नेहाचा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हा व्हिडीओ ६२ हजार पेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे. नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RITVI (@neheartritvi)

Video : नोरा फतेहीचा करीना कपूरच्या ‘फेविकॉल से’ गाण्यावर जबरदस्त डान्स

दरम्यान, नेहा कक्करच नुकतच ख्याल रख्या कर हे गाण प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात नेहा आणि रोहनप्रीत सिंग दोघे आहेत. रोहनप्रीतने नेहा सोबत नेहू दा व्याह या गाण्यात एकत्र काम केले आहे. नेहा आणि रोहनप्रीतने २६ ऑक्टोबर रोजी लग्न केले आहे. त्यांच्या हळदी, मेहंदी, संगीत आणि लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सध्या ती सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 11:28 am

Web Title: neha kakkars hot dance performance on manali trance song throwback video went viral dcp 98
Next Stories
1 Video : नोरा फतेहीचा करीना कपूरच्या ‘फेविकॉल से’ गाण्यावर जबरदस्त डान्स
2 ..म्हणून ‘पतौडी पॅलेस’मध्ये ‘तांडव’च्या शूटिंगसाठी सैफने दिली परवानगी
3 रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X