‘कॉफी आणि बरंच काही’, ‘निळकंठ मास्तर’, ‘आजोबा’, ‘सिध्दांत’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली गुणी अभिनेत्री नेहा महाजन आता ‘युथ’ या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. विक्टरी फिल्म्स प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ हा चित्रपट येत्या ३ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ‘युतिका’ अर्थात नेहा महाजनशी मारलेल्या या गप्पा…

१) तू लवकरच ‘युथ’ या चित्रपटातून प्रेक्षकांना भेटणार आहेस, तर त्यातल्या तुझ्या भूमिकेबद्दल सांग…
माझ्या भूमिकेच नाव आहे ‘युतिका’. ऐकून आणि वाचून मिळालेलं शहाणपण आणि अनुभवातून आलेलं शहाणपण वेगळं असतं. अनुभवातलं शहाणपण जास्त परिपक्व असतं. तर असं अनुभवातलं शहाणपण असलेली ही युतिका आहे. ती खूप उत्कट आहे. तिच्यात नेतृत्व गुण आहेत. एकंदरीत कोणालाही आवडावी अशी ही मुलगी आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा चित्रपट म्हणजे कॉलेजमध्ये जाणाऱ्या एका ग्रुपची गोष्ट आहे. ते एका ट्रिपला जातात. तेव्हा ते पाण्यासाठी लोकांचे होणारे हाल, पाणी प्रश्नामागचं राजकारण, त्यात सर्व सामान्य लोकांचं भरडलं जाणं हे सगळं जवळून पाहतात. त्यानंतर त्या सगळ्यांचा दृष्टीकोन कसा बदलतो, आयुष्यचं एका अर्थी बदलत या सगळ्याची गोष्ट यात आहे.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

२) या चित्रपटात तुझ्या बरोबर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सतीश पुळेकर आहेत, त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
ज्येष्ठ कलाकार सेटवर असतात तेव्हा खूप शिकायला मिळतं. त्यांचा अप्रोच, अनुभव, भूमिकेसाठीची तयारी सगळंच जवळून पाहता येतं, त्यामुळे आपण नकळतपणे खूप शिकत जातो. विक्रम गोखले यांच्याबरोबर या आधी ‘सिद्धांत’ चित्रपटातही काम केलंय. त्यांची कोणत्याही माध्यामाप्रतीची उत्सुकता मला फार आवडते. चित्रपट तयार होण्याच्या प्रक्रियेतले सगळे बारकावे ते नीट समजून घेतात. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या योग्य काम कसं करायचं हे त्यांच्याकडून शिकता येतं.

३) तरुणाई, तिची उर्जा, शक्ती याबद्दल तुला काय वाटतं?
फक्त नटणं मुरडणं, सुंदर दिसणं म्हणजे तरुणपण नाही. तर त्यांचं बिनधास्त असणं, विचारी असणं, त्यांच्यातली उर्मी, त्यांच्या जाणीवा, नेणीवा हे सगळं म्हणजे तारुण्य, हे शिकवणारा हा चित्रपट आहे. तरुणांमध्ये एक प्रचंड उर्मी आणि ताकद असते. ते बिनधास्त आणि बेधडकपणे वागतात पण त्याही मागे त्यांचे असे विचार असतात. त्यामुळे विचारांना कृतीची जोड देणारा हा वर्ग आहे.

४) पाणी टंचाई फार मोठी समस्या झाली आहे. तुमचा चित्रपट ही या प्रश्नावर भाष्य करतो. त्याविषयी काय सांगशील?
पाण्याची मात्रा कमी होत चालली आहे, हे सत्य आहे. आज पाण्यासाठी वणवण करणारी माणसं बरीच आहेत. त्यां माणसांशी आपला संबंध जोडला जात नाही तोपर्यंत आपण निश्चिंत असतो…मात्र ही आपलीच माणसं आहेत, याची जाणीव झाल्यावर आपल्या वागण्यात आपणहून बदल होतो. पाण्याचा अपव्यय होऊ नये, म्हणून आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडेही अधिक लक्ष द्यायला लागतो. जास्त सजग होतो. हा चित्रपट हीच जाणीव करून देण्याचं काम करतो. पाणी हा यक्ष प्रश्न होऊन बसलेल्या भागातल्यांचे आयुष्य, पाण्यासाठीचं स्थानिक राजकारण या सगळ्यावर भाष्य करत असल्याने हा चित्रपट म्हणजे एक शोधच आहे.

५) या चित्रपटात वेगवेगळ्या अर्थाची सुंदर गाणी आहेत. या गाण्यांची जादू रसिकांवर होतेच आहे तर त्यापैकी तुझं आवडत गाणं कोणतं?
सगळीच गाणी खूप सुंदर झाली आहेत. प्रत्येकच गाण्यात नाविन्य आहे. पण एखादं निवडायचं असेल तर मला भारुड फार आवडलं. स्वानंद किरकिरे यांनी ते गायलंय. अगदी ‘बावरा मन देखने चलाsssss , एक सपना’ या गाण्यापासून मला त्यांच्या आवाजातली गाणी आवडतात. तसंच हे ही आता माझं लाडकं गाणं झालं आहे. सयाजी शिंदे यांच्यावर ते चित्रित आहे. हे गाणं प्रेक्षणीय आणि श्रवणीय अशा दोन्ही दृष्टीने मस्त झाल आहे.

६) इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांमध्ये तू काम केलेलं आहेस. दोन्ही मधील जमेची बाजू कोणती वाटली?
इंग्रजी चित्रपटांबद्दल सांगायचं तर मी ‘द पेंटेड हाउस’, ‘एक्स-पास्ट इज प्रेझेंट’ असे काही चित्रपट केले. तिथे बारीक बारीक गोष्टींकडे फार लक्ष दिलं जातं. नंतर तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो कि नाही ही पुढची गोष्ट झाली, पण चित्रपटाच्या प्रक्रियेत अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा बारकाईने विचार होतो, खूप जास्त गांभीर्याने काम केलं जातं. हे फार भावतं मला. मराठीविषयी बोलायचं तर इथे सतत काहीतरी नाविन्यपूर्ण तयार होत असतं. इथे वेगवेगळे विषय सुंदर प्रकारे हाताळले जातात जसा आमचा युथ हा सिनेमा एक खूपच गंभीर विषय घेऊन येत आहे. आत्ताचा विषय, यावर तरूणाईची प्रतिक्रिया, असा विचार करणारी माणसं मराठी सिनेसृष्टीत आहेत, हे खरंच आपलं भाग्य म्हणावं लागेल.

७) युथ चित्रपट का स्वीकारावासा वाटला?
अर्थात कुठलाही चित्रपट स्वीकारताना माझी भूमिका कशी आहे, याचा मी सगळ्यात आधी विचार करते. तिच्यातली उर्मी, तिचा उत्कटपणा यासगळ्यामुळे ही ‘युतिका’ मला भावली. ‘युतीका’साठी मुख्यत्वे हा चित्रपट मी स्वीकारला. आणि जसं मी आत्ताच म्हटलं सद्यपरिस्थिती मांडणारा हा विषय आहे. त्या कथेशी जोडलं जावं असं मला वाटलं म्हणूनही मी हा चित्रपट स्वीकारला.

८) चित्रपटाचं नावंच युथ आहे, तशीच युथची फौज आम्हांला या चित्रपटात बघायला मिळते, तर सेटवर या युथची ऊर्जा किती होती?
आम्ही सेटवर खूप मस्ती करायचो. कॉलेजच्या दिवसांमधल्या गप्पा, भांडणं, चेष्टा, मस्करी असं सगळं इथे आम्ही पुन्हा अनुभवलं. गावात चित्रीकरणाला गेलो तेव्हा मात्र आमची मस्ती पूर्णपणे बदलली. आमच्या मस्तीला समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची, विचार करण्याची किनार आली. त्यामुळे तेव्हा आम्ही गप्पा, चर्चा, विचारांची देवाण – घेवाण जास्त केली.

९) या नंतर तुला कशाप्रकारचे चित्रपट करायची इच्छा आहे?
मला चरित्रपट करण्याची खूप इच्छा आहे. ज्या व्यक्तींना जग ओळखत अशा व्यक्ती पडद्यावर  साकाराण्यातला आनंद वेगळा असेल. त्याशिवाय मला येत्या काळात वेगळ्या धाटणीच्या, मी या आधी न केलेल्या भूमिका हाताळायला नक्कीच आवडतील.