20 September 2018

News Flash

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बिग बॉसच्या घरात जाणार?

१६ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या सिझनचे शूटींग लोणावळा नाही तर गोव्यात होणार आहे.

बिग बॉस हा रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर बराच प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांचीही या रिअॅलिटी शोला विशेष पसंती मिळते. वेगवेगळया गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. या घरात कोणाला प्रवेश मिळणार याबाबतच्या चर्चांना उधाण येते. यामध्ये काही मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींबाबतही चर्चा होती. कलर्स वाहिनीवरुन प्रदर्शित होणाऱ्या या शो च्या पुढील म्हणजे १२ व्या सिझनमध्ये सहभागी होणाऱ्यांची नावे नुकतीच नक्की झाली आहेत. त्यातील एका मराठी अभिनेत्रीचे नाव नक्की झाले असल्याचे नुकतेच समजले आहे. अभिनेत्री कोण असेल याबाबत तुमच्याही मनात उत्सुकता असेल. तर नेहा पेंडसे हे या अभिनेत्रीचे नाव असून तिला या बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली आहे.

या १२ व्या सिझनमध्ये एकूण १९ स्पर्धक असून त्यातील एक स्पर्धक नेहा पेंडसे असणार आहे. नेहाने मराठी आणि हिंदी मालिका तसेच चित्रपट यामध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे बिग बॉसमध्ये आल्यावर तिच्या नावाला आणखी वलय निर्माण होईल यात शंका नाही. याआधीच्या सिझनचे विजेतेपद मराठी अभिनेत्री शिल्पा शिंदे हीने पटकावले होते. त्यामुळे बिग बॉस ११ च्या घरात मराठी नाव कोरले गेले. आता नेहा या सिझनमध्ये काय गोंधळ घालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या १६ सप्टेंबरपासून हा सिझन सुरु होत असून पुन्हा एकदा या घरातील धमाल-मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

HOT DEALS
  • Samsung Galaxy J6 2018 32GB Black
    ₹ 12990 MRP ₹ 14990 -13%
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%
    ₹1485 Cashback

नेहासोबतच या सिझनमध्ये देवोलिना भट्टाचार्य, सृष्टी रोडे, विभा छिब्बर, रिद्धीमा पंडीत, मिलिंद सोमण पत्नी अंकिता कुंवर,दिव्या अगरवाल,स्कारलेट मीरोज,शुभी जोशी,शालीन भनोट,शोएब-दिपिका, गुरमीत-देबीना, पम्मी आंटी फेम सुमेर एस परिछा, महिका शर्मा आणि बॉयफ्रेंड डेनी डी, परम सिंह यांची स्पर्धक म्हणून एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे हा सिझन लोणावळ्यात होणार नसून यंदा गोव्यात होणार आहे.

First Published on September 1, 2018 3:18 pm

Web Title: neha pendse marathi actress probably participate in big boss 12 of colors