News Flash

होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेचं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा केल्याच्या जोरदार चर्चा होत्या.

Neha Pendse: नेहा पेंडसे

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा केल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा फेटाळत नेहाने व्यावसायिक शार्दुल बयाससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नाविषयीची माहिती दिली असून तिच्या होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाने २०२० च्या सुरुवातीला मराठमोळ्या पद्धतीने लग्न करणार असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर अनेकांनी शार्दूलच्या स्थूलतेची खिल्ली उडवली होती. यावर ती म्हणाली, ”फक्त शार्दुलच का? मे आय कम इन मॅडम या मालिकेच्या वेळी माझीसुद्धा मस्करी केली गेली. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही कलाकारांच्या दिसण्यावर प्रतिक्रिया देऊ शकता. पण त्यांच्यावर उगाच निशाणा साधणं चुकीचं आहे.”

”एखादी व्यक्ती आजाराचा, शारीरिक किंवा मानसिक अडचणींचा सामना करत असेल, ही गोष्ट लोकांनी टीका करण्यापूर्वी लक्षात घेतली पाहिजे. शार्दुलचा मनोरंजन विश्वाशी फारसा संबंध नाही. तो एक व्यावसायिक आहे आणि त्याची खिल्ली उडवणं अत्यंत संतापजनक आहे. खिल्ली उडवण्यासाठी आणखी कोणी मिळालं नाही का? अशा कमेंट्स मी खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत नेहाने संताप व्यक्त केला. माझ्या जोडीदाराविषयी प्रश्न उपस्थित करणारे तुम्ही कोण, असा सवालही तिने ट्रोलर्सना केला.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दूलसोबतचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. त्यातीलच एका फोटोमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी अंदाज बांधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 12:42 pm

Web Title: neha pendse on trolls attacking her boyfriend shardul bayas ssv 92
Next Stories
1 शाहिद पुन्हा चढणार बोहल्यावर
2 Video : मेकअप विना अशा दिसतात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्री
3 ‘सात कोटींसाठी KBC मध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर सचिन तेंडुलकरलाही ठाऊक नसेल’
Just Now!
X