08 March 2021

News Flash

मी भारती सिंह किंवा कपिल शर्मा नव्हे; नेहा पेंडसेचं ट्रोलर्सना उत्तर

सौम्या टंडनसोबत नेहाची तुलना

दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नेहा पेंडसेनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय. सब टीव्हीवरील ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेत नेहा पेंडसेची एन्ट्री झालीय. या मालिकेतून अनिता भाभीच्या भूमिकेत नेहा प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या आधी सौम्या टंडन ही अभिनेत्री अनिता भाभाची भूमिका साकारत होती. काही कारणांमुळे सौम्याला मालिका सोडावी लागली.

अनिता भाभी म्हणून मालिकेत नेहाची एन्ट्री होताच अनेकांनी नेहाचं कौतुक केलं. मात्र काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावरुन नेहाला ट्रोल केलंय. नेहाला विनोदी अभिनय जमत नसल्याच्या टीका काही ट्रोलर्सनी केल्या. ट्रोलर्सच्या या टिकेला नेहाने सडेतोड उत्तर दिलंय. ” कॉमे़डी करुन लोकांना हसवायला मी काही कपिल शर्मा किंवा भारती सिंह नव्हे. परिस्थिती आणि भूमिकेनुसार विनोद केला जातो” असं म्हणत नेहानं ट्रोलर्सना उत्तर दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नेहाने तिच्या भावना व्यक्त केल्या. ‘प्रेक्षकांनी सौम्या टंडनला अनिता भाभी म्हणून स्वाकारलं होतं. त्यामुळे नव्या अनिता भाभीला स्विकारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र प्रेक्षक मलाही अनिता भाभीच्या भूमिकेत नक्की स्विकारतील’ असं नेहा म्हणाली. तर अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नेहा पेंडसेची निवड अगदी योग्य असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री सौम्या टंडन हिनं दिलीय.
नेहा तिच्या बोल्ड आणि बिंधास्त स्वभावामुळे ती कायम चर्चेत राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 4:29 pm

Web Title: neha pendse reacts on troll said am not kapil sharma or bharti singh kw89
Next Stories
1 मोनोकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे अंकिता झाली ट्रोल
2 सखी-सिद्धार्थचा ‘बेफाम’ स्वॅग; पाहा व्हिडीओ
3 प्लास्टिक सर्जरीमुळे प्रियांकाला गमवावे लागले होते दोन चित्रपट
Just Now!
X