नेहा शर्मा बॉलिवूडमधील एक प्रतिभाषाली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु एक उत्तम अभिनेत्री असतानाही बॉलिवूडने मला कधीच चांगलं काम दिलं नाही अशी खंत नेहाने व्यक्त केली आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात चमकणाऱ्या नेहाने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. यावेळी तिने आपल्या फ्लॉप चित्रपटांचे कारणही सांगितले.

अवश्य वाचा – “खरंच आपण करोनावर औषध शोधलं का?”; विशालचा मोदींना प्रश्न

नेहाने आजवर ‘दिमाग का दही’, ‘क्रूक’, ‘सोलो’, ‘जयंताभाई की लव स्टोरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु हे चित्रपट फ्लॉप झाले कारण त्याला पटकथा जबाबदार होती असं नेहाला वाटतं. “बॉलिवूड हा खुप मोठा व्यवसाय आहे. या क्षेत्रात अनेक प्रतिभाषाली कलाकार काम करतात. परंतु काही मोजक्याच कलाकारांना एखाद्या चांगल्या स्क्रिप्टवर काम करण्याची संधी मिळते. ज्या कलाकारांकडे फिल्मी बॅकग्राउंड नाही अशा मंडळींना मिळेल ते काम करावं लागतं. त्यांच्यासाठी बॉलिवूडचा प्रवास सोपा नाही. बॉलिवूडमध्ये टिकून राहणं खुप कठीण आहे.” असा अनुभव नेहाने सांगितला.

अवश्य वाचा – करोनासाठी चीनला दोषी ठरवणं पडलं महागात; गायकाने मागितली माफी

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Sharma (@nehasharmaofficial) on

नेहा शर्माने २०१० साली इमरान हाशमीसोबत ‘क्रूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु १० वर्षानंतर ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामुळे तिला खरी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने कमला देवी ही व्यक्तिरेखा साकारली होती.