News Flash

Video : बिग बॉसच्या घरातील नेहाचा ‘मुंगळा’ डान्स होतोय व्हायरल

नेहाच्या या अफलातून डान्सला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

नेहा शितोळे

‘बिग बॉस मराठी २’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते झाले आहेत. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक नेहा शितोळेला या रिअॅलिटी शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा वावर आणि तिच्या स्ट्रॅटेजीस पाहता, घराबाहेर तिचे लाखो चाहते झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर तिच्या एका डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नेहा साडी नेसून ‘मुंगळा’ गाण्यावर ठुमके लावताना दिसून येत आहे.

विकेंडच्या डावात नेहा पारंपरिक वेशात पाहायला मिळत असून पिवळी साडी आणि गळ्यातील मंगळसूत्रामुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुलून येत आहे. महेश मांजरेकरांच्या आग्रहानंतर नेहाने घरातील इतर स्पर्धकांसमोर ‘मुंगळा’ गाण्यावर डान्स सादर केला. तिच्या डान्स व्हिडीओला नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

नेहाच्या या Energetic Dance Performance ला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल…?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:11 pm

Web Title: neha shitole dance on mungala song in bigg boss house viral ssv 92
Next Stories
1 ‘हा’ अभिनेता करत होता सुष्मिता सेनला डेट
2 अपयशी ठरत असल्यामुळे निर्मात्याने मागितली होती जन्मपत्रिका – विद्या बालन
3 आलिया भट्टच्या मैत्रिणीशी असलेल्या कथित नात्याबद्दल के. एल. राहुल म्हणतो..
Just Now!
X