20 November 2019

News Flash

नेहाकडून चित्रपट व नाटक निर्मितीच्या योजना जाहीर

नेहा शितोळे ही बिग बॉसमध्ये अंतिम फेरीत निवडली गेलेली पहिलीच स्पर्धक ठरली आहे.

नेहा शितोळे

नेहा शितोळे ही बिग बॉसमध्ये अंतिम फेरीत निवडली गेलेली पहिलीच स्पर्धक ठरली आहे. सुमारे तीन महिने काम व सामाजिक आयुष्यापासून लांब राहिल्यावर घरातील लोक बिग बॉसनंतरच्‍या आपल्या योजनांबाबत चर्चा करत आहेत. आरोह आणि शिवानीमध्ये झालेल्या चर्चेनंतर नेहाने वूटच्या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्ये नाटक किंवा चित्रपट निर्मिती करण्याच्या योजना सांगितल्या आहेत.

हा संवाद सुरू होताना आरोह म्हणतो की, ”नाटकात जरा पैसे असले असते ना तर काहीही करायची गरज नाही आहे.” तर पुढे नेहा म्हणते की, ”पण येऊ लागले आहेत ना आता आरोह! असं नाही आहे. अच्छे दिन आ रहे हैं” ती पुढे म्हणते की, ”मी ठरवलं आहे, जे काही होईल आणि मी जिंकले आणि मला पैसे मिळाले तर मी आलोकला सांगीन की मी नाटकात काम करीन.

आणखी वाचा : राखी सावंत होणार आई?; शेअर केला ‘हा’ फोटो

आरोह यावर विचारात पडतो आणि तिला म्हणतो की, कोणत्याही नाटकासाठी किमान ५०-६० लाख रूपये लागतील. त्याला नेहा तात्काळ नकार देते आणि म्हणते की, ”प्रायोगिक नाटकाला नाही लागणार रे.”

आरोह मग म्हणतो की, ”प्रायोगिक नाही व्यावसायिक! तरंच करायचं नाहीतर काही पॉइंट नाही. आणि खूप चांगली स्क्रिप्ट असली पाहिजे.”

त्यावर नेहा स्क्रिप्टची मूलभूत गरज व्यक्त करते आणि म्हणते की, ”ती तर मूळ गरज आहे. स्क्रिप्टचीच मारामार आहे सध्या बाहेर.” त्यानंतर हे तिघे मनोरंजन उद्योगात कंटेंट आणि कलात्मकता कशी महत्त्वाची आहे त्याबाबत चर्चा करतात. बिग बॉसनंतर नेहा तिच्या करिअरसाठी सज्ज आहे असे दिसते.

First Published on August 25, 2019 3:00 pm

Web Title: neha shitole on further plans after bigg boss marathi 2 ssv 92
Just Now!
X