News Flash

नेहा पेंडसेने नवऱ्याबाबत केला ‘हा’ खुलासा

शार्दूलने लग्नाआधीच मला या गोष्टीची कल्पना दिली होती, असं तिने सांगितलं.

नेहा पेंडसे, शार्दूल सिंह बयास

‘बिग बॉस’ फेम आणि मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसे नुकतीच विवाहबंधनात अडकली. ५ जानेवारी रोजी नेहा आणि शार्दूल सिंह बयास यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्नगाठ बांधली. १४ ऑगस्ट २०१९ मध्ये शार्दूलने नेहाला इटलीत प्रपोज केलं होतं. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत नेहाने याविषयीची माहिती दिली होती. यावेळी शार्दूलने त्याच्या आधीच्या लग्नाविषयी पूर्ण कल्पना दिली होती, असं नेहाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नेहाने लग्नापूर्वी दोन-तीन रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. मात्र ही नाती फार काळ टिकली नाही. शार्दूलनेही त्याच्या संसारात बरेच चढउतार सहन केले. याविषयी ती म्हणाली, “होय, शार्दूलने दोनदा लग्न केलं आणि त्याला दोन सुंदर मुली आहेत. त्याने माझ्यापासून काहीच लपवलं नव्हतं. लग्नापूर्वी फार काळ आधीच मला या सर्व गोष्टी माहित होत्या आणि त्याने माझ्याशी लग्न करण्यापूर्वी दोनदा लग्न केलं तर त्यात काय चुकलं? आयुष्य तिथेच संपत नाही.”

शार्दूलविषयी नेहाच्या मनात प्रेमभावना कधी आली याबद्दल तिने पुढे सांगितलं, “तो खूपच समजूतदार आणि हुशार आहे. त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असते, तो बऱ्याच ठिकाणी फिरला आहे. जगभरातील घडामोडींवर त्याचं लक्ष असतं. व्यक्ती म्हणून तो मला फार आवडला. ज्यांच्याकडून मला काहीतरी शिकायला मिळेल अशा व्यक्तींसोबत मला बोलायला फार आवडतं. शार्दूल असाच व्यक्ती आहे. त्याने त्याच्या लग्नाविषयी मला सांगितलं आणि मीसुद्धा त्याला माझ्या ब्रेकअपविषयी सर्वकाही सांगितलं होतं.”

एका मित्राच्या पार्टीत शार्दूल आणि नेहाची पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर काही कामानिमित्त त्यांची पुन्हा भेट झाली आणि हळूहळू या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 10:53 am

Web Title: nehha pendse reveals her husband shardul singh bayas has two kids from his previous failed marriages ssv 92
Next Stories
1 सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांवर करीनाचं मजेशीर उत्तर
2 ‘मार लो डंडे, कर लो दमन…’; स्वानंद किरकिरेंची मनाला भिडणारी कविता
3 #JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….
Just Now!
X