News Flash

दोन वर्षांच्या मुलीसह अभिनेता नील नितीन मुकेशचा संपूर्ण परिवार करोनाच्या कचाट्यात!

करोनाला हलक्यात न घेण्याची केली विनंती

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता नील नितीन मुकेश याच्या संपूर्ण परिवाराला करोनाची लागण झाली आहे. त्यात त्याच्या २ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

नीलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये नील म्हणतो, “सर्व प्रकारची काळजी घेऊनही आणि घरात राहूनही माझ्या परिवारातले सदस्य आणि मला करोनाची लागण झाली आहे. आम्ही सर्वजण सध्या विलगीकरणात आहोत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहोत. त्याचप्रमाणे सर्व कोविड संबंधित नियमांचं पालनही करत आहोत. तुमचं प्रेम आणि काळजीबद्दल धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh)

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “तुमचं प्रेम आणि आशिर्वादाची गरज आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. हलक्यात घेऊ नका.”
आजतकच्या वृत्तानुसार, नीलने एका मुलाखतीत सांगितलं, “नूरवीलाही करोनाची लागण झाली आहे ह्या गोष्टीने मी अस्वस्थ आहे. तिचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुदैवाने तिला आता काही त्रास नाही. दोन दिवसांपूर्वीपासून तिला ताप होता. म्हणूनच आम्ही टेस्ट केली. माझे वडिल, भाऊ, रुक्मिणी आणि नूरवी सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. फक्त माझी आई व्यवस्थित आहे.”

नुकतंच अभिनेता अर्जुन रामपाललाही करोनाची लागण झाली आहे. डिझायनर मनिष मल्होत्रा, अभिनेता सुमीत व्यास हेही करोनाबाधित आहेत. तर अनेक कलाकारांनी करोनावर मात केली आहे. अभिनेता अक्षय कुमार, आलिया भट्ट, कतरिना कैफ, विकी कौशल, भूमी पेडणेकर यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:24 pm

Web Title: neil nitin mukesh full family tested postive for coronavirus vsk 98
Next Stories
1 ‘मोस्टली सेन’ फेम प्राजक्ता कोळीला करोनाची लागण
2 अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
3 पोपटलालचं होणार लग्न? होणाऱ्या वधूच्या स्वागतासाठी ‘गोकुळधाम’वासी सज्ज
Just Now!
X